स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर ; शिवनेरीनंतर आता सिंहगड करणार सर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 03:16 PM2021-08-13T15:16:02+5:302021-08-13T15:26:29+5:30

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

Governor Bhagat Singh koshyari on a two-day visit to Pune on the backdrop of Independence Day | स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर ; शिवनेरीनंतर आता सिंहगड करणार सर 

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर ; शिवनेरीनंतर आता सिंहगड करणार सर 

Next

पुणे :  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते १५ ऑगस्टला सकाळी ९ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे. 

दरम्यान 16 ऑगस्ट रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चक्क सिंहगडाला भेट देणार आहे. या पूर्वी आपल्या पुणे दौऱ्या दरम्यान त्यांनी ऑगस्ट महिन्यात शिवनेरी गड सहज सर केला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशा प्रकारे पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण अवाक् झाले होते. आता ते शिवनेरी नंतर सिंहगड सर करणार आहेत. 

मागील वर्षी १६ ऑगस्टला यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला होता. अशा प्रकारे पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण अवाक् झाले. यावेळी त्यांनी शिवनेरी गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेत विविध वस्तूंबाबत जाणून घेतले होते. गडावरील विविध झाडांची नावे विचारत आणि दिलखुलास गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला होता. शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा करत तेथील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

Web Title: Governor Bhagat Singh koshyari on a two-day visit to Pune on the backdrop of Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.