शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

रोजगार निर्मिती ‘कौशल्या’त सरकार नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 7:25 PM

राज्यसरकारने रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीची स्थापना केली.

ठळक मुद्देप्रशिक्षणार्थींना मिळालेला रोजगार आणि स्वयंरोजगाराचे प्रमाण हे जेमतेम साडेबावीस टक्केएका विद्यार्थ्यामागे सरासरी तब्बल १ लाख सव्वीस हजार रुपये खर्च

पुणे : रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने सुरु केलेली महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी रोजगार निर्मिती कौशल्यात अनुत्तीर्ण ठरली आहे. गेल्या तीन वर्षांत रोजगार प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी जेमतेम साडेबावीस टक्के उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट, त्यावर झालेला प्रत्यक्ष खर्च आणि उपलब्ध रोजगार या तीनही पातळ्यांवर ही सोसायटी अपयशी ठरली आहे. राज्यसरकारने रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेणे निश्चित करण्यात आले. सोसायटीच्या माध्यमातून २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत ३ लाख ७८ हजार ३५३ हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५३२ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील अवघ्या ३१ हजार २४८ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या रोजगार संख्येत स्वयंरोजगाराचे प्रमाण २ हजार ४४ इतके आहे. प्रशिक्षणार्थींना मिळालेला रोजगार आणि स्वयंरोजगाराचे प्रमाण हे जेमतेम साडेबावीस टक्के इतके आहे.रोजगाराचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ७१९ कोटी २० लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी २३१ कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. त्यापैकी १८८ कोटी रुपयांचे अनुदान संस्थेला मिळाले असून, त्यातील १०७ कोटी ८१ लाख रुपये खर्च झाले आहेत. प्रशिक्षणासाठी २०१५-१६मध्ये ६७७ संस्था होत्या. त्यासंख्येत पुढील वर्षी १ हजार ४७५ पर्यंत वाढ झाली. तर २०१७-१८मध्ये हे प्रमाण १ हजार ९४ इतके झाले. सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि मिलिंद बेंबाळकर यांनी ही माहिती समोर आणली आहे. -----------------------

साल        कौशल्य उद्दीष्ट    प्रशिक्षणार्थी संख्या        रोजगार प्राप्त    स्वयंमरोजगार प्राप्त    २०१५-१६    ७५,०००        १९,२४७            ५,५७६        १८४२०१६-१७    १,००,०००    ७७,८२१            १७,१०४        १,२६०२०१७-१८    २,०३,३५३    ४१,४६४            ६,५२४        ६००एकूण        ३,७८,३५३    १,३८,५३२        २९,२०४        २,०४४

---------------

विद्यार्थ्यामागे सव्वालाखांचा खर्च रोजगारक्षम करण्यासाठी सरकारने २०१७-१८ या वर्षी ७ हजार १२४ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. एका उमेदवारामागे त्यांना सरासरी तब्बल १ लाख सव्वीस हजार रुपये खर्च आला. तर गेल्या तीन वर्षांची एका उमेदवारामागील खर्चाची सरासरी ३४ हजार ५०० रुपये इतकी आहे. ..............कौशल्य विकास सोसायटी : प्रशिक्षणार्थींपैकी जेमतेम साडेबावीस टक्क्यांनाच रोजगारकौशल्य प्रशिक्षण हा रोजगार निर्मितीचा एक मार्ग असल्याचे सरकार सातत्याने सांगत आहे. मात्र सरकारने ठेवलेल्या उद्दीष्टाच्या तुलनेत काही हजारांनाच रोजगार उपलब्ध झाला आहे. या सर्वप्रकारामुळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांभोवती संशयाचे वलय उभे राहते. त्यावरुन या संस्थांनी काम केले नसल्याचे स्पष्ट होते.  विवेक वेलणकर, सजग नागरीक मंच   ------------------------

टॅग्स :PuneपुणेVivek Velankarविवेक वेलणकरGovernmentसरकार