शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला देशात दंगली घडवायच्यात; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 08:00 IST

हे सरकार किती स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आहे ते लवकरच उघड करेन.

पुणे: आगामी निवडणुका टाळण्यासाठी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण करता यावी, यासाठी सरकारला देशभरात दंगली घडवायच्या आहेत. किंबहुना तोच सरकारचा प्रमुख अजेंडा आहे, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या सातव्या पंचवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. देशातील विविध समूहांमध्ये अस्वस्थता पसरविण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. दंगल माजविणे हाच सरकारचा अजेंडा आहे. कारण दंगलीनंतर व्यवस्था कोलमडल्याच्या नावाखाली आणीबाणी लावून निवडणुका घेता येणार नाहीत, असे वातावरण तयार केले जाईल. मात्र, सरकारला दंगल करण्याची, जाळपोळ करण्याची संधीच मिळू देऊ नका. सत्ता हाती घेण्याचे ध्येय ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्यावर होत असलेल्या नक्षलवादाच्या आरोपांबाबत येत्या १३ जूनला मुंबईत उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात आतापर्यंत हिंदू-मुस्लिम वाद भडकविण्यात आला. आता आरक्षणाच्या विरोधात रान पेटविण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते आरक्षणाविरोधात मोर्चे काढत आहेत, यज्ञ करत आहेत. सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही. कदाचित या प्रश्नावर दंगल माजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताच्या संसदेत बहुमत नसल्याने वातावरण तापविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, या प्रकारांकडे दुर्लक्ष करून सरकारला दंगल घडविण्याची संधी मिळू देऊ नका. आगामी निवडणुकीत सत्ता हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार किती स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आहे, याबद्दल एक गौप्यस्फोट करणार असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र