पक्षनेत्यांनी नाकारले शासकीय वाहन
By Admin | Updated: March 16, 2017 01:49 IST2017-03-16T01:49:51+5:302017-03-16T01:49:51+5:30
महापौर आणि उपमहापौर निवड बिनविरोध झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पदभार स्वीकारताच नवा आदर्श घालून दिला आहे

पक्षनेत्यांनी नाकारले शासकीय वाहन
पिंपरी : महापौर आणि उपमहापौर निवड बिनविरोध झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पदभार स्वीकारताच नवा आदर्श घालून दिला आहे. महापालिकेच्या खर्चाची बचत करण्यासाठी महापालिकेचे वाहन वापरणार नसल्याचे पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी आपल्या कामाची सुरुवात आजपासून केली. पवार म्हणाले की, माझ्याकडे स्वत:ची गाडी आहे. त्यामुळे मी माझ्या खासगी गाडीचा वापर करणार आहे. एका गाडीवर जर दीड-दोन लाख रुपयांचा महापालिकेचा खर्च होत असेल, तर त्याची बचत व्हावी व तो महापालिकेच्या इतर कामांसाठी वापरला जावा म्हणून मी महापालिकेचे वाहन नाकारले आहे. तसेच पक्षातर्फे एक सकारात्मक संदेश जनतेत जाणे गरजेचे आहे. कारण जनतेने जो विश्वास ठेवला आहे तो आम्हाला सार्थ करायचा आहे. पवार म्हणाले की, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. कोणावर याचे बंधन नाही.’’ (प्रतिनिधी)