शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

सरकारने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. परीक्षा ...

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. परीक्षा वेळेवर न होणे, तसेच रखडलेल्या नियुक्त्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने योग्य पावले उचलून एमएससीबाबत नियोजन करावे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. आता तिसरी लाट ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची असेल, असा इशारा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. अनास्थेचा बळी ठरलेल्या सरकारने आता तरी वेळेवर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही या वेळी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीतून स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरून दिसून येत आहे.

विद्यार्थिनी संध्या सोनवणे म्हणाली, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे. मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वेळेवर परीक्षा न घेतल्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे, यामुळे येणाऱ्या काळात अशा घटना उद्भवू नये, यासाठी एमपीएससीने यूपीएससीच्या पावलावर पाऊल ठेवून वेळेवर आणि नियोजन करून परीक्षा घेतल्या पाहिजेत.'

''२०१९ ला जाहिरात आलेली गट ब ची परीक्षा ५- ६ वेळेस पुढे ढकलण्यात आली. ती अजूनही झालेली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेली वय आणि कर्जाचा डोंगर ह्यामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आलेले आहेत. संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख, रखडलेल्या सर्व परीक्षांचे आणि नवीन जाहिरातीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी राम लेंडेवाड याने केली आहे.''

''सरकारकडून एमपीएससीसाठी वेळेवर मागणीपत्र प्राप्त होत नाही. त्यामुळे परीक्षाही वेळेवर होत नाहीत. तसेच एमपीएससीची पाच सदस्य, एक अध्यक्ष अशी रचना असताना गेली तीन वर्षे फक्त एक अध्यक्ष व एक सदस्य मिळून कारभार पाहत आहेत. त्यामुळे ना निकाल वेळेवर लागतो ना परीक्षा वेळेवर होतात. म्हणून हा सरकारी अनास्थेचा बळी आहे. सरकारने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,” असे विद्यार्थी नीलेश निंबाळकर याने सांगितले आहे.

स्टुडंट हेल्पिंग हँड अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणाले, आत्महत्या नसून एक प्रकारे व्यवस्थेकडून झालेला खूनच आहे. असे सत्र गेल्या तीन वर्षांपासून सतत चालूच आहे. कोणतेही शासन असो - आधीचे किंवा आत्ताचे, वर्षानुवर्षे फटका मात्र विद्यार्थ्यांनाच बसत आला आहे. परीक्षा पास झाल्यावर देखील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जुन्या मंडळींकडून अपेक्षा ठेवणे कठीण आहे. पण राज्याच्या युवा नेतृत्वाने पक्ष, संघटना या सर्वांपलीकडे जाऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अन्यथा असे अनेक स्वप्नील आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत, हे लक्षात त्यांनी घ्यावे.