शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! Sputnik V लस मोफत देणार सरकार; पोलिओ डोससारखी गावागावात पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 08:29 IST

corona vaccination: Sputnik V ला १८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये साठवावी लागते. यामुळे पोलिओ डोससाठी जी कोल्ड चेन वापरली जाते तीच या लसीसाठी वापरता येणार आहे. यामुळे ही लस ग्रामीण भागात पोहोचवणे सोपे होणार आहे. 

पुणे : रशियाची कोरोना लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) लवकरच सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. कोरोनावरील वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन के अरोडा यांनी सांगितले की, ही लस मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या स्पुतनिक व्ही लस केवळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होती. आता सरकारद्वारे दिली जाणारी लस ही पुरवठ्यावर अवलंबून असणार आहे. आम्हाला ती मोफत लसीकरण मोहिमेतून उपलब्ध करायची आहे. (Government will give Sputnik V corona vaccine free at vaccination centers.)

Sputnik V ला १८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये साठवावी लागते. यामुळे पोलिओ डोससाठी जी कोल्ड चेन वापरली जाते तीच या लसीसाठी वापरता येणार आहे. यामुळे ही लस ग्रामीण भागात पोहोचवणे सोपे होणार आहे. अरोडा यांनी सांगितले की, पोलिओ लसीकरणामुळे काही भागात कोरोना लसीकरण धिमे झाले आहे. आता कोरोना लसीकरण पुढील आठवड्यापासून वेगाने होईल. आजवर ३४ कोटी लसी टोचण्यात आल्या आहेत. जुलैच्या अखेरीस १२ ते १६ कोटी डोस मिळतील. जानेवारीतच केंद्राने जुलैपर्यंत ५० कोटी डोस देण्यात येतील असे म्हटले होते. 

दररोज १ कोटी कोरोना लसी देण्याचे लक्ष्यकोरोना लसीकरणात मोठा वाटा कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा आहे. अरोडा यांच्यानुसार लसीकरणाचे उत्पादन वाढविण्याशिवाय, स्पुतनिक व्ही लस आणि मॉडर्ना व झायडस कॅडिलाची नवीन लस आल्यास दररोजचे ५० लाख डोस वाढून ८० लाख किंवा १ कोटी होऊ शकतात.

सरकारचे लक्ष्य या वर्षाच्या शेवटी १८ वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीला कव्हर करण्याचे आहे. डॉ. अरोडा यांनी सांगितले, ICMR च्या एका ताज्या अहवालानुसार फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज आहे. अशावेळी देशाकडे ८ महिन्यांचा वेळ आहे. तिसरी लाट डेल्टा प्लस व्हेरिअंटला जोडणे ही घाई होईल. भारतात या व्हेरिअंटचे ५२ रुग्ण सापडले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या