शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी धोरणांचा अभ्यास आणि विश्लेषण झाले पाहिजे : विद्यासागर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 18:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून गेल्या चार वर्षांत नावीन्यपूर्ण धोरणांचा अवलंब करून जनहिताचे विविध निर्णय घेण्यात आले. या धोरणांमुळे देशाची प्रगती गतीने होत असून, त्याचा अभ्यास आणि विश्लेषण झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी व्यक्त केली.

ठळक मुद्देकल्पकता आणि नवप्रवर्तनाचे प्रर्तिंबब दिसणारे १७ निर्णय या पुस्तकात समाविष्ट

पुणे : देशाची गंगाजळी संपुष्टात येत असतानाच्या कालखंडात तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणातून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्यानंतर देशातील सरकारने सातत्याने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयांमुळे देशाचा विकास झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून गेल्या चार वर्षांत नावीन्यपूर्ण धोरणांचा अवलंब करून जनहिताचे विविध निर्णय घेण्यात आले. या धोरणांमुळे देशाची प्रगती गतीने होत असून, त्याचा अभ्यास आणि विश्लेषण झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि नीती आयोगाचे सदस्य धीरज नय्यर यांच्या  ‘द इनोव्हेशन रिपब्लिक : गव्हर्नन्स इनोव्हेशन्स इन इंडिया अंडर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त राज्यपाल राव बोलत होते. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनोगत व्यक्त केले. यशदाचे महासंचालक आनंद लिमये, उपमहासंचालक प्रेरणा देशभ्रतार, प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे आणि महासंचालक रवींद्र साठे या वेळी उपस्थित होते.     प्राचीन भारतामध्ये प्रशासकीय लोकशाही नांदत होती, असे सांगून राव म्हणाले, नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी हे केंद्र सरकारने दोन क्रांतिकारी निर्णय घेतले. व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते यांच्यापासून ते अगदी सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागला तरी या निर्णयांचे स्वागतच झाले. देशातील गरीब जनतेला बॅकिंग प्रवाहामध्ये आणण्याच्या उद्देशातून घेतलेला जन-धन योजना हा सरकारचा निर्णय म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’ आहे. त्यामुळे विद्याार्थ्यांची शैक्षणिक शिष्यवृत्ती आता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने अन्नधान्य सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, जल सुरक्षा आणि बेरोजगारी हटविण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा अभ्यास आणि विश्लेषण झाले पाहिजे.     सहस्त्रबुद्धे म्हणाले, मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कालखंडात शासकता आणि प्रशासकतेमध्ये वहिवाट सोडून बिकट वाटेने जाण्याची वृत्ती वाढलेली दिसली. शासकता आणि प्रशासकता या विषयामध्ये गेल्या चार वर्षांत घडलेल्या नवमन्वंतरावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. कल्पकता आणि नवप्रवर्तनाचे प्रर्तिंबब दिसणारे १७ निर्णय या पुस्तकात समाविष्ट आहेत. या निर्णयांचे दर दोन किंवा पाच वर्षांनी पुनरावलोकन करून नवप्रवर्तनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.     ------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी