विद्यापीठांच्या दर्जावर राज्यपालांची नाराजी, कुलगुरूंना कानपिचक्या; प्रगतीचा आलेख मांडावा - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:35 AM2018-04-08T00:35:17+5:302018-04-08T00:35:17+5:30

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत राज्यपाल आणि कुलपती विद्यासागर राव यांनी शनिवारी विद्यापीठांच्या दर्जावरून कुलगुरूंना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून मिशन मोडवर काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.

The Governor's dissatisfaction over the status of universities, the Vice Chancellor; Make a progress graph - Chief Minister | विद्यापीठांच्या दर्जावर राज्यपालांची नाराजी, कुलगुरूंना कानपिचक्या; प्रगतीचा आलेख मांडावा - मुख्यमंत्री

विद्यापीठांच्या दर्जावर राज्यपालांची नाराजी, कुलगुरूंना कानपिचक्या; प्रगतीचा आलेख मांडावा - मुख्यमंत्री

Next

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत राज्यपाल आणि कुलपती विद्यासागर राव यांनी शनिवारी विद्यापीठांच्या दर्जावरून कुलगुरूंना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून मिशन मोडवर काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, रवींद्र वायकर आदी उपस्थित होते.
देशातील अव्वल विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या यादीत महाराष्ट्राला अपेक्षित स्थान मिळाले नसल्याबद्दल राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकात्मिक विद्यार्थी व्यवस्थापन प्रणाली विकसित करावी, शैक्षणिक लेखापरीक्षण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करणे आणि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नीट नियोजन करावे, कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा प्रगतीदर्शक अहवाल वेळोवेळी सादर करावा, असे राज्यपाल म्हणाले.
विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा उपयोग विद्यापीठाचे अधिकाधिक श्रेणीवर्धन करण्यासाठी करावा आणि त्यामुळेच पुढील बैठकीत प्रत्येक कुलगुरूंनी आपापल्या विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख सादरीकरणातून मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. उत्तम कामगिरी बजावणाºया महाविद्यालयांना स्वायत्तता देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम
कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य
सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर.ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, रुसाच्या प्रकल्प संचालक मीता राजीव लोचन, वैद्यकीय शिक्षणचे सचिव संजय देशमुख आदी उपस्थित होते.

अभ्यासपूर्ण आराखडा असावा

Web Title: The Governor's dissatisfaction over the status of universities, the Vice Chancellor; Make a progress graph - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.