सरकारी परिचारिका संपाच्या मार्गावर
By Admin | Updated: June 27, 2014 22:55 IST2014-06-27T22:55:37+5:302014-06-27T22:55:37+5:30
सरकारी सेवेतील परिचारिका संपाच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारी परिचारिका संपाच्या मार्गावर
>पुणो : अनेक वर्षापासून सरकारी सेवेतील परिचारिकांकडून केल्या जाणा:या मागण्या पूर्ण होत नसल्याने आणि परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती देऊनही त्या केल्या जात असल्याच्या कारणावरून सरकारी सेवेतील परिचारिका संपाच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक विभागाचे उपसंचालक, बीड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक यांनी परिचारिकांना त्रस देऊन बदल्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वेळी फेडरेशनच्या खजिनदार सुमन टिळेकर उपस्थित होत्या. आठवले म्हणाल्या, ‘‘परिचारिकांच्या रिक्त जागा भरल्या जाव्यात, आमच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, परिचारिकांना सोयीसुविधा मिळाव्यात, बदल्या करण्यात येऊ नयेत आदी मागण्यांसाठी अनेक वर्षापासून आम्ही शासनाचे दरवाजे ठोठावत आहोत, आंदोलने करीत आहोत. मात्र, शासन याची दखल घेत नसल्याने दि. 24 व 25 फेब्रुवारीला आम्ही राज्यव्यापी संप केला होता. यामध्ये सुमारे 23 हजार परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.’’
बदल्यांना त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. ती गेल्या महिन्यात संपताच काही आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी परिचारिकांच्या बदल्या केल्या. त्याच वेळी आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा त्याला स्थगिती दिली. मात्र, आम्हाला आदेश मिळाला नसल्याचे कारण दाखवून 1,2क्क् परिचारिकांच्या अन्यायपूर्ण बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने वेळोवेळी दिलेली अश्वासने न पाळल्याने आम्ही संपाचा विचार सुरू केला असून, त्या संदर्भात 6 जुलैला संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात
वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांसह संप करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.(प्रतिनिधी)