शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

शासकीय यंत्रणा-व्यावसायिक यांच्यात होणार कुरघोड्या ?

By admin | Updated: March 3, 2016 01:35 IST

तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक

इंदापूर : तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक यांच्यात कुरघोड्या होण्याची शक्यता बळावली आहे. या दोन्ही बाजूंचा निपक्षपाती तपास होणे गरजेचे बनले आहे. उजनी धरण व नीरा-भीमा नद्यांचे खोरे, पाणलोट क्षेत्र हा इंदापूर तालुक्यातील सर्व भाग ‘काळ्या सोन्याची खाण’ मानला जातो. शासनाला महसूल व व्यवसायिकांना वाळू हवी आहे. अन् या दोन्ही गरजेच्या सांधीमधला शासकीय प्रवृत्तीला मधला ‘मलिदा’ हवा आहे. एकीकडे मलिदा ही खायचा आणि दुसरीकडे कारवाईही सहन करायची, या तोंड दाबून बुक्क्या मारण्याच्या प्रकाराचा ज्या वेळी कडेलोट झाला. त्या वेळी निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर यांच्या नेतृत्वाखाली वाळू व्यावसायिक एकत्र झाले. फेब्रुवारी महिन्याच्या आठ तारखेला पुणे व सोलापूर जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण रस्त्याच्या डोंगराई ढाब्यानजीक तब्बल दीड तासांचा रास्ता रोको केला. तहसील कार्यालयात हंगामा केला. या गोष्टीला सतरा दिवस उलटल्यानंतर गुरुवारी (दि. २५) तहसीलदारांचा शासकीय वाहनचालक अनिल जयसिंग काळे (वय ५५, रा. पाटील बंगला परिसर, इंदापूर) यांचा डोंगराई ढाबा सर्कलजवळ अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सचिन पांडुरंग माने, नवनाथ किसन एकाड (दोघे रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तहसीलदार सूर्यकांत येरले यांना गुन्हा नोंदवतेवेळी धमकी देऊन शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून, दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ एकाडचा भाऊ शिवाजी एकाड यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. तिघेही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत सखोल चौकशी करताना, काही बाबीही प्रकाशात आल्या आहेत. काळे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी फोन करून काळे यांना बोलावून घेतले. सचिन माने या आरोपीने काळे यांच्या दुचाकीला ठोस दिली, असा उल्लेख केला आहे. मुळात काळे यांना त्या दिवशी सुट्टी नव्हती, ते नोकरीवर असताना, त्यांनी दुचाकीवरून येणे चुकीचे आहे. जर, आरोपींनी फोन केला व ते निर्धास्तपणे आरोपींकडे आले. याचा अर्थ त्यांचे आधीपासूनचे लागेबांधे असणार आहेत. आरोपींना त्यांना जिवे मारायचे असते, तर त्यांनी स्वत:चे वाहन वापरलेच नसते. परहस्ते ते असे कृत्य करू शकले असते.