शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शासकीय यंत्रणा दलालांच्या मुठीत

By admin | Updated: June 18, 2017 03:29 IST

दस्तुरखुद्द प्रांताधिकारी यांनी बोगस जमीन खरेदी नोंदणीचे फेरफार रद्द करण्याचे आदेश दिले असताना, तलाठ्याला हाताशी धरून जागेची विक्री केली.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : दस्तुरखुद्द प्रांताधिकारी यांनी बोगस जमीन खरेदी नोंदणीचे फेरफार रद्द करण्याचे आदेश दिले असताना, तलाठ्याला हाताशी धरून जागेची विक्री केली. त्यानंतर बनावट कागदपत्रांद्वारे नव्या खरेदीदाराचे नाव सात-बारा उताऱ्यावर लावण्याचे प्रताप दलालांनी शासकीय यंत्रणाच हाताशी धरून केल्याचे उजेडात आले आहे. पवन मावळातील खडकगेव्हंडे गावातील जमीन खरेदी-विक्रीचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शासकीय यंत्रणा आपल्या मर्जीनुसार वापरात आणण्याइतपत येथील दलालांची मजल गेली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दलालांशी लागेबांधे असल्यामुळे पवन मावळात बोगस खरेदी-विक्रीचा अनागोंदी कारभार बिनबोभाट सुरू आहे. मूळ मालकाच्या जागी बनावट व्यक्ती उभ्या करुन खोट्या दस्तांच्या आधारे बोगस खरेदी-विक्रीचे व्यवहार राजरोसपणे केले जात आहेत. याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात दलालांच्या टोळीविरूद्ध तक्रार देण्यात आली आहे. मूळ मालकाने नोंदविलेल्या हरकतीनुसार खरेदीखत दस्ताचा फेरफार रद्द करण्याचा आदेश मावळच्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याच महसूल यंत्रणेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे उजेडात आले आहे. खडकगेव्हंडे गावातील जमीन गट क्रमांक ५८/२ ही ३७.४ आर जागा मुंबईतील राजन बहल व महेंद्र पी. बहल या बंधूंनी डरायस रफत यांच्याकडून १७ मे १९९० ला खरेदी केली. दस्त क्र. २३१४/१९१० नुसार खरेदीखत नोंदणी झाली, तसेच फेरफार क्र.५९८ नुसार सातबारा उताऱ्यावर बहल बंधूंची नावे आली. व्यवसायानिमित्त मुंबईत असल्याने बहल बंधूंना खडकगेव्हंडे गावातील ताबा वहिवाटीतील जमिनीकडे लक्ष देता आले नाही. या संधीचा गैरफायदा उठवत दलालांनी ४ एप्रिल २०१४ ला रमेश अनंत खोपडे (वय ४५, रा. दत्तवाडी, पुणे) व विजय बजाजीराव शिंदे (वय ४६, रा. कळस माळवाडी, आळंदी रोड, पुणे) यांच्याशी बनावट कागदपत्रांद्वारे जागेचा व्यवहार केला. खरेदीखत क्रमांक १६९३/२०१४ नुसार फेरफार क्र. १०३५ ने खोपडे आणि शिंदे यांची नावे सातबारा उताऱ्यावर आली.तलाठ्यांचे सोयीस्कर दुर्लक्षसात-बारा उताऱ्यावर त्यांचे नाव लावण्यासाठी बहल प्रयत्नशील आहेत, हे लक्षात येताच रमेश अनंत खोपडे व विजय बजाजीराव शिंदे यांनी चाणाक्षपणा दाखवून जागेची विक्री केली. खरेदी दस्त क्र.५३५९/२०१५ नुसार चेतन शरद चिंचवडे (वय २८, रा. चिंचवडगाव, पुणे) व हरीष कोंडू कोकरे (वय २५, रा. कुसगाव बुद्रुक, लोणावळा) यांची नावे सात-बारा उताऱ्यावर आली. फेरफार क्र. १०४७ नुसार सात-बारावर चिंचवडे व कोकरे यांची नावे लागली. ४तक्रारीनंतर बनावट दस्तऐवजांच्या आधारे झालेल्या जमीन विक्री व्यवहारानंतरच्या सातबारावर नोंदीचे फेरफार रद्द करावेत, असे आदेश मावळचे प्रांताधिकारी सुनील थोरवे यांनी १६ नोव्हेंबर २०१६ ला दिले होते. मात्र, तलाठ्याने प्रांताधिकाऱ्यांचे आदेश जुमानले नाहीत. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली. बनावट दस्ताद्वारेखरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बहल बंधूंनी केली आहे.फसवणुकीचा गुन्हा...राजन बहल आणि महेंद्र बहल यांच्या नावाची बनावट कागदपत्रे या व्यवहारासाठी वापरण्यात आली. बहल बंधूंच्या नावाचे बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक खाते पुस्तक जमीन-विक्री व्यवहारात वापरले गेले. याबाबत बहल यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दलालांचे रॅकेटतातडीने विक्री व्यवहार करायचा, कायदेशीर गुंतागुंत वाढवायची, असे उपद्व्याप करणारी दलालांची टोळी सक्रिय असल्याचे या निमित्ताने निदर्शनास आले आहे. यंत्रणेचा अत्यंत खुबीने वापर करून फसवणूक करणाऱ्या या टोळीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.