सरकारही पालिकेचे थकबाकीदार
By Admin | Updated: June 6, 2016 00:28 IST2016-06-06T00:28:17+5:302016-06-06T00:28:17+5:30
महापालिकेच्या बड्या मिळकतकर थकबाकीदारांमध्ये पुण्यातील फक्त उद्योजक व कंपन्याच नाहीत, तर केंद्र, राज्य सरकारच्या काही आस्थापनाही आहेत

सरकारही पालिकेचे थकबाकीदार
पुणे : महापालिकेच्या बड्या मिळकतकर थकबाकीदारांमध्ये पुण्यातील फक्त उद्योजक व कंपन्याच नाहीत, तर केंद्र, राज्य सरकारच्या काही आस्थापनाही आहेत. पालिकेचे तब्बल १३ कोटी रूपये त्यांनी थकवले आहेत. पीएमपीएमल या सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा कंपनीनेही पालिकेचे ४ कोटी रूपये देणे आहे. सातत्याने मागणी करुनही हे सरकारी थकबाकीदार पालिकेची दखल घ्यायला तयार नाहीत.
एकूण ६०९ सरकारी कार्यालये शहराच्या हद्दीत आहेत. त्यांना पालिकेकडून मिळकत कर आकारला जातो.
अन्य मिळकतकर थकबाकीदारांप्रमाणेच या थकबाकीदारांनाही पालिकेकडून दंडासह आकारणी केली जाते. त्यामुळे थकीत कर जमा केला नाही तर तो वाढतच जातो. महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून या सर्व कार्यालयांच्या विभागप्रमुखांकडे थकबाकीसाठी पाठपुरावा करण्यात येत असतो असे पुणे महापालिकेचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)