पुणे : जिल्ह्यातील १४0८ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ७०९ ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिल रोजी मतदान होत असून, लोकसभा व विधानसभेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आखाडा रंगणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक खेडच्या ९२ ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यानंतर भोर-७३, शिरूर-७३, जुन्नर-६६, पुरंदर-६६, इंदापूर-६२, मावळ-५७, हवेली-५७, बारामती- ५०, दौंड-५०, मुळशी-४५, वेल्हा-३०, आंबेगाव-३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांत गावकीच्या राजकारणात दिग्गजांचा कस लागणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लागलेले अनपेक्षित निकाल आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना प्रचंड महत्त्व आले आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाचही पक्षांची पॉकेट्स असणाऱ्या भागांतील निवडणुका होत असल्याने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकांनाही राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीसाठी आरक्षणांच्या सोडतीचे काम पूर्ण होत आले आहे़ राजकीय वातावरण तापू लागले आहे़आंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी खुर्द, बारामतीतील माळेगाव, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिरूरमधील तळेगाव ढमढेरे, केंदूर, सणसवाडी, पुरंदरमधील दिवे, जवळार्जुन, नीरा या मोठ्या गावांवर वर्चस्व मिळविण्यासाठी मोठी चुरस होणार आहे. (प्रतिनिधी)निवडणुकीची वैशिष्ट्ये४लोकसभा व विधानसभा निवडणुकीसारख्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार. ४या वेळी प्रथमच थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका घेण्यात येणार आहेत.४आयोगाने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक आदर्श प्रणाली जाहीर केली आहे.४लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. आंबेगाव : मंचर, अवसरी खुर्द, पेठ, महाळुंगे पडवळ अशा अनेक महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायती तालुक्यातील महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या आहेत. इंदापूर : कळस, लोणी देवकर, निमगाव केतकी, पळसदेव, लासुर्णे, सणसर, कळंब, वालचंदनगर या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीं आहेत.भोर : अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या गावांचा समावेश असल्याने प्रत्येक जण ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नसरापूर, किकवी, शिंदेवाडी यांसारख्या मोठ्या गावांमध्ये चुरस दिसून येण्याची शक्यता आहे़ वेल्हा तालुक्यातील मार्गासनी येथील निवडणुकीकडे लक्ष असणार आहे़ मुळशी : भुकुम, पौड, कोळवण या प्रमुख गावांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे़ हिंजवडी ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची असेल़ पुरंदर : दिवे , नीरा, राख परिंचे येथील निवडणूक लक्षवेधी होऊ शकते़ शिरूर : वडगाव रासई, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, गोलेगाव, निमगाव म्हाळुंगे या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.हवेली : लोणी काळभोर, थेऊर, उरळी कांचन, आळंदी म्हातोबाया ग्रामपंचायतींचे प्रश्न वेगळे आहेत़ कोंढणपूर, खेडशिवापूर, श्रीरामनगर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत़ जुन्नर : खोडद, निमगाव सवा, ओतूर, ओझर, शिरोली बु़ या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे़ खेड : सर्वाधिक ८४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत असून, या निवडणुकांमध्ये विमानतळ, औद्योगिक वसाहती व तेथील रोजगार हे प्रश्न असणार आहेत़ बारामती : वडगाव निंबाळकर, होळ, माळेगाव खुर्द, खांडज या मोठ्या ग्रामपंचायतींची निवडणूकही लक्षवेधी होऊ शकेल़ दौंड : बोरीपारधी, कानगाव, रावणगाव, यवत, पाटस या मोठ्या निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष राहील़
पुन्हा रंगणार राजकीय आखाडा
By admin | Updated: March 24, 2015 23:14 IST