शासन-एनजीओमध्ये समन्वयाचा अभाव
By Admin | Updated: July 13, 2015 03:48 IST2015-07-13T03:48:40+5:302015-07-13T03:48:40+5:30
शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि राज्य शासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे असंघटीत कामगारांच्या आणि भटक्या विमुक्त

शासन-एनजीओमध्ये समन्वयाचा अभाव
पुणे: शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि राज्य शासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे असंघटीत कामगारांच्या आणि भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दररोज शाळेत जाण्याऐवजी ही मुले पालकांबरोबर रस्त्यावर भीक मागण्यासाठी किंवा मिळेल ते काम करण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, शाळेत प्रवेश घेवूनही शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रत्येक ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला. शासनातर्फे शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांसह ,शालेय पोषण आहारही दिला जात आहे. परंतु, तरीही रस्त्यावर किंवा झोपडपट्टीत राहणारी मुले दररोज शाळेत जात नाहीत.