नीरा येथे गोळीबारात एक गुंड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST2021-07-17T04:10:51+5:302021-07-17T04:10:51+5:30

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शुक्रवारी (दि. १६) ७ च्या सुमारास नीरा येथील गुंड गणेश रासकर (वय ४१) यांच्यावर कोणीतरी ...

A goon was killed in a shooting at Nira | नीरा येथे गोळीबारात एक गुंड ठार

नीरा येथे गोळीबारात एक गुंड ठार

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शुक्रवारी (दि. १६) ७ च्या सुमारास नीरा येथील गुंड गणेश रासकर (वय ४१) यांच्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना घडली.

नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस व जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता नीरा येथील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील एस्टी स्टँडनजीक गुंड गणेश विठ्ठल रासकर हा पल्सर गाडीवर आला होता. त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाल्याने त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करीत आहेत.

Web Title: A goon was killed in a shooting at Nira