शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात राज्य महिला आयोगाकडून विद्यार्थीनींना 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 12:26 IST

विविध शाळांतील १८०० मुली यात सहभागी...

धायरी (पुणे) : ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारा उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. काल (२८ सप्टेंबर) विविध शाळांतील १८०० मुली यात सहभागी झाल्या.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून विद्यार्थिंनींसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन बँक – आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना मोफत दरमहा सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी शाळा-महाविद्यालये यांच्याशी समन्वय ठेवण्यात येतो. मुलींची नोंदणी करुन त्यांना ओळख पत्र दिले जाते. दर महिन्याला ओळख पत्र दाखवत, नोंद करुन घेत शाळा - महाविद्यालयातच मुलींना सॅनिटरी पॅड मिळते.

बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकीन बॅंकसाठी नोंदणी करण्यासोबतच मुलींना गुड टच-बॅड टचचे शिक्षण देणारी व्हिडिओ फिल्मही दाखविण्यात आली. यावेळी डॅाक्टरांच्या टीमकडून मुलींना सॅनिटरी नॅपकिनचा वापर, चांगले आरोग्य राखण्यासाठी काळजी याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले.  

यावेळी बोलताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “मुलींना योग्य शिक्षण मिळाले तर सक्षमतकडे वाटचाल सुरु राहते. त्यांच्या शिक्षणात, आरोग्यात अडथळे येउ नये यासाठी आयोगाकडून सॅनिटरी नॅपकीन बॅंक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या बॅंकेत मुलींना दरमहा शाळेतच नॅपकीन्स दिले जातात. शालेय शिक्षण सुरु असतानाच त्यांचे आरोग्य जपण्याचा हा प्रयत्न आहे. स्त्रियांना उपजत स्पर्शाची जाणीव असतेच पण लहान वयातच याबाबत मुलींना जागरुक, सतर्क केल्यास अनेक गोष्टी रोखता येऊ शकतात. मुलींना सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने गुड टच-बॅड टच बाबत विडियो फिल्ममधून शिक्षण देण्यात येत आहे. विविध शाळांमधे मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद आमचा ही उत्साह वाढवणारा आहे.”

धायरी येथील बंडोजी खंडोजी शाळेत, खेडशिवापुर येथील शिवभूमी शाळा, खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालय, खडकवासला येथील यशवंत विद्यालय, रामनगर खडकवाडी येथील विमलाबाई नेर्लेकर विद्यालय या ५ शाळांमधे झालेल्या कार्यक्रमात १८०० मुलींची नॅपकीन बॅंकेत नोंदणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरPuneपुणे