पाडवा वाचनामध्ये चांगल्या पावसाचे भाकीत
By Admin | Updated: March 29, 2017 02:07 IST2017-03-29T02:07:45+5:302017-03-29T02:07:45+5:30
बोरी (ता. इंदापूर) येथे सकाळी पाडवावाचन करण्यात आले. दर वर्षी प्रमाणे या वर्षीही पाडव्याचे वाचन करण्यात आले

पाडवा वाचनामध्ये चांगल्या पावसाचे भाकीत
काझड : बोरी (ता. इंदापूर) येथे सकाळी पाडवावाचन करण्यात आले. दर वर्षी प्रमाणे या वर्षीही पाडव्याचे वाचन करण्यात आले. पोलीसपाटील गुलाब जगताप याच्या पाडव्याचे पूजन करून वाचनास सुरुवात करण्यात आली.
वाचनात यंदा पाऊस चांगल्या स्वरूपाचा पडेल, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पाऊस पडेल. पिके, फळे, फुले जोमात येतील. झाडांची, फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात होईल. सातू, मूग, राळ या प्रकारचे धान्य चांगले पिकतील. त्यातून भरघोस उत्पादन मिळेल. देशाची आर्थिक स्थिती चांगली राहील. बँका व पतसंस्था यांच्यात वाढ होईल. व्यापारीवर्गासाठी हे वर्ष भरभराटीचे आहे. व्यवहार करणाऱ्या लोकांना सावध राहावे लागेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि पिकाना चांगला बाजारभाव मिळेल. संशोधन खात्यात प्रगती राहील, असे पाडवा वाचनात भाकित आहे. (वार्ताहर)