शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रेकर्स'साठी खुशखबर ! आता गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 12:31 IST

ट्रेकर्सला दिलासा : नियमांचे पालन करणे असणार बंधनकारक.!  

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती. पण आता 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत आता जिल्ह्यातील गड किल्ले आणि डोंगर कड्यांवर ट्रेकिंगसाठी जाता येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'ट्रेकिंग'ला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे निश्चितच ट्रेकर्सला दिलासा मिळाला आहे. 

     ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने धरण परिसरातील पर्यटन निर्बंध हटविण्यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले त्याचप्रमाणे गड किल्ल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण आणि ट्रेकिंग करण्यासंबंधी परवानगी द्यावी अशी विनंती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने काही अटी आणि शर्तींसह गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला परवानगी दिली आहे.     त्यानुसार ट्रेकिंगच्या एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. ग्रुपमधील सदस्य संख्या अधिक असल्यास वेगवेगळे ग्रुप करून वेळेमध्ये फरक ठेवावा. ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच योग्य ते शारीरिक अंतर राखण्याबाबतचा नियम पाळण्यात यावा. दहा वर्षांच्या आतील मुले आणि पासष्ट वर्षांवरील व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये.  ताप, सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्तींचा सहभाग टाळावा. स्थानिकांच्या घरात भोजन आणि मुक्काम, त्याचप्रमाणे सदस्यांनी इतरही एकत्रितपणे मुक्काम करू नये. एकमेकांच्या वस्तू उदा: मोबाईल, कॅमेरे एकमेकांनी हाताळू नयेत.    

या अटींचा भंग केल्यास आणि विषाणू संसर्ग होईल असे कृत्य केल्यास ही परवानगी रद्द केली जाईल तसेच संबंधितांविरुद्ध आपत्ती कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला सूचित केले आहे. .......

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगcollectorजिल्हाधिकारीFortगड