शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! पुणेकरांची 'लाईफलाईन' उद्यापासून सुरू; पाच महिन्यांनी वाजणार 'डबल बेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 18:52 IST

लॉकडाऊन काळातील अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या वगळता सर्वसामान्यांसाठी ही सेवा तब्बल ५ महिने बंदच होती.

ठळक मुद्दे४२१ गाड्या, १९० मार्ग, पहाटे ५ ते रात्री १०

पुणे: सलग ५ महिन्यांच्या बंदीनंतर गुरूवारपासून मध्यमवर्गीय पुणेकरांची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू होत आहे. पीएमपीच्या ४२१ गाड्या १९० मार्गांवर धावू लागतील. पहाटे ५ वाजता पहिली डबल बेल वाजेल. रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.  कोरोना टाळेबंदीत २३ मार्चला पीएमपीएल बंद झाली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या वगळता सर्वसामान्यांसाठी ही सेवा तब्बल ५ महिने बंदच होती. उद्या (गुरूवारी) पहाटे ५ वाजता ती सुरू झालेली असेल. सरकारने त्यासाठी काही अटी टाकल्या आहेत. त्याचे तर पालन करण्यात येईलच शिवाय पीएमपीएलही कोरोनापासून काळजी म्हणून काही सुविधा देणार आहे.पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, मुख्य म्हणजे प्रत्येक बस सॅनीटाईज करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रमुख स्थानकावर संपुर्ण बस सॅनिटाईज केली जाईल. हे काम खासगी संस्थेकडे दिले असून त्यावर पीएमपीएल अधिकाऱ्यांची देखरेख असणार आहे. प्रवाशांसाठी चालकाकडे सॅनिटायझर असेल. प्रवाशांना सुरक्षित अंतर समजावे यासाठी कुठे बसायचे व कुठे बसायचे नाही यावर मार्किंग करण्यात येणार आहे. चालक हा प्रवाशांपासून पुर्ण विलग असेल. त्याच्या व प्रवाशांच्या मध्यभागी एक अर्धपारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे.सरकारने फक्त ५० टक्के क्षमतेनेच पीएमपीएल सुरू करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे फक्त ४२१ गाड्याच रस्त्यावर असतील. त्या १९० मार्गांनी धावणार आहेत. त्यात स्वारगेट, पुणे स्थानक, शिवाजीनगर या प्रमुख स्थानकांपासून शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर ये- जा करणार आहे. त्याशिवाय अन्य महत्वाच्या ठिकाणांचाही यात समावेश आहे. तिकीटाच्या दरात काहीही बदल करण्यात आलेला नाही. सवलतीही पुर्वी होत्या त्या सुरूच राहणार आहेत असे जगताप यांनी सांगितले.गुरूवारी पहाटे ५ वाजता पहिली गाडी सुरू होईल. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत सर्व गाड्या सुरू राहतील. सर्व चालक वाहक आता सज्ज आहेत. पीएमपीएल बंद असल्याने शहरातील सर्वसामान्य वर्गाची फार अडचण होत होती. त्यांना रिक्षा परवडत नव्हती. उपनगरांमधून शहरात कामांसाठी म्हणून येणाºया घरकामगार महिला तसेच रोजगारावर काम करणारे पुरूष यांना आता पीएमपीएल सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त