शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी खुशखबर : चारही धरणे भरण्याच्या मार्गावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 13:26 IST

दाच्या वर्षी झपाट्याने खालावलेली खडकवासला साखळीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली असून सध्या ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला असून वर्षभराच्या पाण्याची सोय झाली असे म्हणण्यास हरकत नाही.

पुणे : यंदाच्या वर्षी झपाट्याने खालावलेली खडकवासला साखळीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली असून सध्या ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला असून वर्षभराच्या पाण्याची सोय झाली असे म्हणण्यास हरकत नाही. दुसरीकडे मुळशी धरणही ९३टक्के भरले आहे.          यंदा तीव्र उन्हाळा  आणि बाष्पीभवन यांच्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासलाधरण साखळीतील पाण्याच्या पातळी सातत्याने कमी होत होती. अक्षरश: पुणेकरांचा घसा कोरडा पडावा इतके पाणी कमी झाल्याने शहरावर पाणी कपात करण्याची वेळ आली होती. मात्र उशिरा का होईना पण दमदार पावसाच्या आगमनाने हा फरक भरून काढला असून मागील  वर्षीपेक्षाही जास्त पाणीसाठ्याची नोंद झाली आहे

   सध्या खडकवासला धरणात १. ९७ टीएमसी (१००%), पानशेत धरणात १०.५७ टीएमसी (९९.२७%), वरसगाव धरणात १०.६० टीएमसी (८२. ७१%), आणि टेमघर धरणात २.७१ टीएमसी (७३.१९%) इतका पाणीसाठा आहे.  हा एकूण पाणीसाठा ८८.७२ टक्के इतका असून मागील वर्षी हा साठा  ८६. ६७  टक्के इतका होता. एकूणच धरण परिसरात जोरदार पाऊस  झाल्यामुळे पर्यटकांनीही गर्दी केली आहे.  शनिवार-रविवार तर नागरिक हमखास या भागात पर्यटनासाठी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

 मुळशी धरण ९३% भरले असून आहे. त्या भागातही पावसाचा जोर वाढला असल्याचे दिसून येत आहे . या धरणातून आज कोणत्याही क्षणी विसर्ग चालू करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीकाठची  गावे, वाड्या ,वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये.  वीजेवरील मोटारी, इंजिने शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जिवीत वा वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन टाटा पॉवर प्रशासनाने कळवले आहे.

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाDamधरणRainपाऊस