शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील प्रवाशांसाठी गुड न्यूज! पीएमपीची संख्या वाढणार; बुधवारपासून ११०० बस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 10:48 IST

पीएमपीच्या बसची संख्या वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय

ठळक मुद्देकोरोनाचे नियम पाळूनच प्रवास करण्याचे आवाहन

पुणे : पुण्यातील निर्बंधात सूट देत असताना सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढत होती. काही दिवसातच सण, उत्सव सुरु होत असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. प्रवाशांची गैरसोय न होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने पीएमपी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बुधवारपासून सुमारे ११०० बस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धावतील. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. सध्या दररोज सुमारे चार लाख २५ हजारांहून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे दररोज ७० ते ७५ लाख रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा होत आहेत.  उपनगरे आणि जिल्ह्यांतील बसच्या वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे.

कोरोनाचे नियम पाळूनच प्रवास करावा 

‘‘सध्या ९५० ते १००० बस दोन्ही शहरांत धावत आहेत. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता बस वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान ११०० बस बुधवारपासून वाढविण्यात येतील. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून प्रवाशांना प्रवास करण्याचे आवाहन पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी केले आहे.'' 

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या