शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी खुशखबर ; नव्या वर्षात पीएमपीचा प्रवास स्वस्त होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 21:05 IST

नवीन वर्षामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रशासनाने पंचिंग पासच्या दरात ४० ते १०० रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना २२ दिवसांच्या दर आकारणीमध्ये संपुर्ण महिन्याचा प्रवास करता येणार आहे.

पुणे : नवीन वर्षामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रशासनाने पंचिंग पासच्या दरात ४० ते १०० रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना २२ दिवसांच्या दर आकारणीमध्ये संपुर्ण महिन्याचा प्रवास करता येणार आहे.पीएमपीचा पंचिंग पासद्वारे एका ठराविक मार्गावरच प्रवास करता येतो. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पुर्वीचा २२ दिवसांच्या पासची आकारणी २४ दिवसांची केली होती. या निर्णयाला प्रवासी संघटनांनी जोरदार विरोध केला होता.

पंचिग पासचे दर वाढल्यानंतर प्रवाशांची संख्याही रोडावल्याचा दावा संघटनांनी केला होता. काही अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा पंचिंग पाससाठी २४ दिवसांऐवजी २२ दिवसांची दर आकारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पासच्या दरामध्ये ४० ते १०० रुपयांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जानेवारीपासून सुरू होणार आहे.त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी सासवड, उरळीकांचन व राजगुरूनगर या तीन ठिकाणी दि. २४ डिसेंबरपासून पुर्ववत पास विक्री केंद्र सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना याठिकाणीही पास उपलब्ध होणार आहेत. हे पास पुर्ववत सकाळ सत्रामध्ये देण्यात येणार आहेत. सध्या महामंडळाकडून ४० पास विक्री केंद्रांद्वारे प्रवाशांना पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पंचिंग पासचे दर कमी करण्यात आल्याने या पासला प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी