शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! यंदाचा ’PIFF’ सिनेमागृहात अनुभवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 7:35 PM

जगातील जवळपास दीडशेहून अधिक उत्तमोत्तम चित्रपट पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे

पुणे : देशविदेशातील दर्जेदार चित्रपटांची मेजवानी देणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) पुढच्या महिन्यात ऑफलाईन होणार आहे. मार्चमधील हा नियोजित महोत्सव कोरोनामुळे स्थगित झाल्याने रसिकांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले. आता हा महोत्सव २ ते ९ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. जगातील जवळपास दीडशेहून अधिक उत्तमोत्तम चित्रपट पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.  महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी उद्या (दि. 18) पासून तसेच चित्रपटगृहांमधील नोंदणी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्यातर्फे २ ते ९ डिसेंबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (nfai pune) येथे होणार आहे. यंदाचे महोत्सवाचे 19 वे वर्ष आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपटसंग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर आणि चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे उपस्थित होते. 

शुड द विंड ड्रॉप, इन द शॅडोज, अप्परकेस प्रिंट, ए कॉमन क्राइम, द एलियन, काला अझार, ट्रू मदर्स, नाइट ऑफ द किंग्ज, रशियन डेथ, डिअर कॉमरेड्स, शर्लटन, द बेस्ट फॅमिलिज्, आयझॅक, १२ बाय १२ अनटायटल्ड या चित्रपटांची जागतिक स्पर्धा विभागासाठी निवड झाली आहे.

चार महिन्यात दोनदा पिफ

नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) करोनामुळे यंदा जानेवारी महिन्यात झाल्याने जानेवारीत होणा-या पिफच्या तारखा बदलण्यात आल्या. मात्र, मार्चमध्ये आयोजित करण्यात आलेला पिफ करोनामुळे स्थगित झाला. यंदाचा पिफ आता डिसेंबरमध्ये पार पडल्यानंतर पुढील वर्षीचा पिफ नेहमीच्या वेळपत्रकानुसार आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उशिरात उशिरा फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत २० व्या पिफचेआयोजन झाल्यास चित्रपटप्रेमींना कमी अंतरामध्ये दोन महोत्सव अनुभवता येतील, असे डॉ. जब्बार पटेल यांनी स्पष्ट केले.

मराठी स्पर्धात्मक विभागासाठी निवडलेले चित्रपट

मकरंद माने दिग्दर्शित- पोरगा मजेतंयविठ्ठल मच्छिंद्र भोसले दिग्दर्शित- फिरस्त्यावैभव खिस्ती आणि सुह्रद गोडबोले दिग्दर्शित- जूनगजेंद्र अहिरे दिग्दर्शित- गोदाकाठमकरंद अनासपुरे दिग्दर्शित- काळोखाच्या पारंब्याविशाल कुदळे दिग्दर्शित -टक टक

या चित्रपटांचा होणार प्रिमिअर

शैलेंद्र कृष्णा दिग्दर्शित- गोतगिरीश मोहिते दिग्दर्शित- ताठ कणामहेश कंद दिग्दर्शित- कंदीलकिरण निर्मल दिग्दर्शित- मे फ्लायप्रशांत दत्तात्रय पांडेकर दिग्दर्शित- जीवनाचा गोंधळ

टॅग्स :PuneपुणेPIFFपीफartकलाcinemaसिनेमा