शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी! मान्सूनचा प्रवास वेगाने; आज सकाळीच लावली पुण्यात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:20 IST

प्रथमच पुण्यासह अलिबागपर्यंत मॉन्सूनचे आगमन

ठळक मुद्देरविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २४.५ मिमी, पाषाण येथे १०.१ मिमी आणि लोहगाव येथे ६०.५ मिमी पावसाची नोंद

पुणे: शनिवारीच महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या मॉन्सून एक्सप्रेसने आपला प्रवास असाच वेगवान ठेवत आज पुण्यात प्रवेश केला आहे. मॉन्सूनने अलिबाग, पुणे, मेडक, नलगौंडा, श्रीहरी कोटा येथपर्यंत मजल मारली असल्याचे जाहीर केले. उस्मानाबाद जिल्ह्यात मॉन्सूनने प्रवेश केला आहे.

पुणे शहरात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोलापूर, सातारापर्यंत मजल मारलेल्या मॉन्सूनने पुण्यातही प्रवेश केला असल्यासारखे वातावरण शनिवारी रात्री होते. त्याप्रमाणे हवामान विभागाने मॉन्सूनने पुण्यात प्रवेश केल्याचे जाहीर केले. मात्र, रविवारी सकाळपासून लख्ख ऊन पडले असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात यापूर्वी ८ जूनला मॉन्सून येत असल्याचे मानले जात असे. मात्र, गेल्या ३० वर्षाच्या प्रत्यक्ष आगमनावरुन पुण्यात मॉन्सूनचे आगमन १० जून रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यामानाने यंदा मॉन्सूनचे पुण्यात लवकर आगमन झाले आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २४.५ मिमी, पाषाण येथे १०.१ मिमी आणि लोहगाव येथे ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनच्या बंगालच्या उपसागरातील दुसर्‍या शाखेने आज जोरदार मुसंडी मारत ईशान्य भारतातील बहुतांश भागात प्रवेश केला. नागालँड, मणिपूर, मेझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश तसेच पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये मॉन्सूनने प्रवेश केला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNatureनिसर्गKeralaकेरळ