शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवार्ता! अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल; सिंधुदुर्गात मान्सूनचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:56 IST

दक्षिण कोकणात पावसाच्या सरी

पुणे : गेले काही दिवस कर्नाटकातच रखडलेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. आज अखेर दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तसेच पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे राज्याची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे.

मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात स्थिती अनुकूल झाली असून मध्य विषवृत्तीय प्रवाह हळूहळू गतिमान होत आहे. तसेच अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागला असून मान्सूनची वाटचाल उत्तरेकडे सुरू झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली.

दक्षिण महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त येत्या दोन दिवसांत मान्सून कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा उर्वरित भाग, दक्षिण आंध्रप्रदेशचा काही भाग तर बंगालचा उपसागरात पोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह घाट परिसरात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज असून त्यानंतरच्या दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही हीच स्थिती असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :RainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलkonkanकोकण