भक्तांना खुशखबर; शेगांवसाठी एसटीची विना वातानुकुलीत स्लीपर पुणे -शेगाव सूरू

By अजित घस्ते | Published: December 5, 2023 06:24 PM2023-12-05T18:24:05+5:302023-12-05T18:25:24+5:30

भाविकांसाठी आता खुशखबर एसटीची सवलतीच्या दरात विना वातानुकुलीत स्लीपर बस पुणे -शेगाव सूरू करण्यात आली आहे

Good news for devotees Non AC sleeper of ST for Shegaon Pune Shegaon Suru | भक्तांना खुशखबर; शेगांवसाठी एसटीची विना वातानुकुलीत स्लीपर पुणे -शेगाव सूरू

भक्तांना खुशखबर; शेगांवसाठी एसटीची विना वातानुकुलीत स्लीपर पुणे -शेगाव सूरू

पुणे: गजानन महाराज संस्थान शेगावचे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पूणे येथून जाणाऱ्या हजारो भक्त शेगांवला वातानुकुलीत स्लीपर एसटीने सुरू करण्याची मागणी करीत होते. त्यानुसार भाविकांसाठी आता खुशखबर एसटीची सवलतीच्या दरात विना वातानुकुलीत स्लीपर बस पुणे -शेगाव सूरू करण्यात आली आहे.

मंगळवार (दि. ०५) डिसेंबर पासून राज्यपरिवहन मंडळाने शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानकातून पुणे -शेगाव- पुणे विना वातानुकुलीत स्लीपर (शयनयान) बस सेवा चालू करण्यात आली आहे. सदरची बस शिवाजीनगर आगार वाकडेवाडी येथून रात्री २१.०० वा. निघणार आहे.व दुसऱ्या दिवशी ०७.०० वा.शेगाव येथे पोचणार आहे. यासाठी प्रत्येक प्रवाश्यास रु.९९०-/ एवढे भाडे असून सदर बस करीता सर्व सवलती लागू असतील. तसेच सदर सेवा हि आरक्षण प्रणालीसाठी एसजीएन  या सांकेतिक कोड नुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर व इतर संकेतस्थळा वरून देखील आरक्षण करता येईल. सदर सेवा हि अल्प दरात असून प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर रणवरे आगार व्यवस्थापक  शिवाजीनगर आगार यांनी केले आहे.

Web Title: Good news for devotees Non AC sleeper of ST for Shegaon Pune Shegaon Suru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.