शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

आनंदाची बातमी! वळवाची चिंता नको, यंदा पाऊस पडेल भरघोस: डॉ. अनुपम कश्यपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 06:10 IST

अवकाळी, वळवाचा मान्सूनशी संबंध नाही

पुणे :  यंदा अवकाळी व वळवाच्या पावसाने राज्याला हैराण करून सोडले आहे. कधी नव्हे ते या उन्हाळ्यात उन्हाऐवजी पावसाळाच अधिक अनुभवायला मिळत आहे. येत्या मान्सूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असून, त्याचा पावसावर काही प्रभाव पडणार नाही. अल निनो असतानाही भारतात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनीही मान्सूनबाबत घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

सध्या उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही? याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परंतु, अवकाळी व वळवाच्या पावसाचा आणि मान्सूनच्या पावसाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिनाअखेर अजून सुधारित अहवाल हवामानशास्त्र विभाग जाहीर करणार आहे. त्यावर पावसाचा नक्की अंदाज समजणार आहे. अल निनोचा प्रभाव असतानाही यापूर्वी चांगला पाऊस झाल्याचे निरीक्षण आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा घेणार, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दावा

यामुळे बेमोसमी पाऊस

उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाने जमीन खूप तापत असते. चक्रीय वात स्थिती निर्माण होते आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापलेल्या जमिनीवर ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. त्याला अवकाळी अथवा वळीव म्हटले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात असा पाऊस पडणे नॉर्मल आहे.

परिणाम कशामुळे?

अल निनोची तीव्रता आणि मान्सूनचा काळ यावर बरेच अवलंबून असते. अल निनो निर्माण होण्याची वेळ, त्याची पोझिशन आणि त्याची तीव्रता यावरून मान्सूनवर त्याचा काय प्रभाव असेल? याचा अंदाज बांधता येतो. अल निनोशिवाय हिंदी महासागरातील तापमान, उष्णकटीबंधीय प्रदेशातील स्थानिक हवामान यांचाही मान्सूनवर परिणाम होतो. सध्या हिंदी महासागरातील तापमान सर्वसाधारण असल्याचे एन्सो बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशल