शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी खुशखबर ! खरेदीसाठी रविवारी दुकाने दिवसभर राहणार सुरु ; आयुक्तांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 17:29 IST

सोमवारपासून लॉक डाऊन होणार सौम्य 

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिले पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदीकरिता वेळ मिळावा याकरिता सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आयुक्तांनी लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, काय बंद राहणार याचे सविस्तर आदेश काढले होते. पहिले पाच दिवस कडक आणि नंतरचे पाच दिवस सौम्य लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यातील पहिल्या पाच दिवसांची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारपासून सौम्य लॉकडाऊन सुरू होणार आहे.रविवारपासून दुकाने सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत उघडण्यास मुभा देण्यात येणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ रविवार करिता सकाळी आठ ते संध्याकाळी सहा अशी वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सहा तासांची सवलत प्रशासनाने दिली आहे. सोमवारपासून मात्र सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेतच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. दुपारनंतर पुन्हा सर्व बंद ठेवावे लागणार आहे. नागरिकांनी नियम व निकषांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्या