दौंड : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले, तर सत्ताधारी रासपाचे आमदार राहुल कुल यांचा धुव्वा उडून दारुण पराभव झाला. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, बसपा यांना मात्र जनतेने नाकारल्याने या पक्षाच्या उमेदवारांना एकही जागा मिळाली नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, ‘रमेश थोरात जिंदाबाद’च्या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमला. या निवडणुकीत राष्ट्रवादीला गटात ५, तर गणात ११ जागा मिळाल्या, तर रासपाला गटात १ आणि गणात एका जागेवर समाधान मानावे लागले. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. साधारणत: दुपारी पावणेबारापर्यंत टपाली मतदान मोजणी सुरू होती. त्यानंतर गट आणि गणातील मोजणीला १२च्या सुमारास सुरुवात झाली. दरम्यान, मतमोजणी संथ गतीने सुरू झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीपती मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल नाराजीचा सूर होता. एकीकडे १२च्या सुमाराला जिल्ह्यातील बहुतांश निकाल हाती आले होते; मात्र दुपारी दीड ते दोनच्या सुमाराला निकाल जाहीर होणार सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला यवत-भांडगाव, पाटस-खडकी, लिंगाळी-मलठण, बोरीपार्र्धी-कानगाव, केडगाव-पारगाव हे गट मिळाले तर रासपाला राहू-खामगाव गट मिळाला. पंचायत समिती गणात राष्ट्रवादीला यवत, भांडगाव, खामगाव, पारगाव, केडगाव, पाटस, खडकी, बोरीपार्धी, कानगाव, लिंगाळी, मलठण हे गण मिळाले तर रासपाला राहूचा गण मिळाला. (वार्ताहर)यांची झाली अनामत जप्त पारगाव-केडगाव गटातून पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा डॉ. वंदना मोहिते यांनी बंडखोरी केली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. बसपाचे योगेश कांबळे, किरण पोळ, स्वाभिमानीचे राजाराम कदम, काँग्रेसचे प्रल्हाद महाडिक, सर्जेराव म्हस्के, काँग्रेसचे सुनील म्हस्के, विठ्ठल खराडे, शिवसेनेचे नीलेश थोरात, बसपाच्या रंजना नांदखिले, स्वाभिमानीच्या मंजुश्री धुमाळ, शिवसेनेचे भारत सरोदे यांच्यासह अन्य काही अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.वैशाली नागवडे पराभूतराहूबेटात या आमदार राहूल कूल यांच्या बालेकिल्ल्यात यावर्षी राष्ट्रवादीने महानंदच्या माजी अध्यक्षा तथा पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा यांना तिकीट देवून हा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यात ते अपयशी ठरले.
दौैंड तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले यश
By admin | Updated: February 24, 2017 02:05 IST