शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणामुळे चित्रकारांना 'अच्छे दिन'' : भिंतींवर अवतरले पुणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:58 IST

रुक्ष, कोरड्या भिंतींवर रंगांची उधळण

ठळक मुद्देचित्र काढता येतात याचाच आनंदखडबडीत भिंतींवर चित्र काढायचे एक वेगळेच शास्त्र

राजू इनामदार- 

पुणे: महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमुळे शहरातील नवोदित, होतकरू चित्रकारांना अच्छे दिन आले आहेत. संपुर्ण शहरातील भिंतींवर वेगवेगळ्या रंगांची उधळण सुरू आहे. कुठे पुण्यातील ऐतिहासिक वास्तुंचे, तर कुठे जिल्ह्यातील धरणांचे तर कुठे नव्याजु्न्या इमारतींचे दर्शन पुणेकरांना शहरातील रस्त्यांच्या कडेंना असणाऱ्या संरक्षक भिंतींवर होत आहे...

       लातूर, उस्मानाबाद अशा दुष्काळी भागातून पुण्यात येणाऱ्या व कसेबसे राहत, कोणतेही काम करणाऱ्या चित्रकारांना यातून चांगले काम मिळाले आहे. ज्ञानेश्वर दिलीपराव सोमुलवार हा गाव नळगीर, ता. उदगीर, जि. लातूर मधून काही वर्षांपुर्वी पुण्यात आला. अभिनव महाविद्यालयामधून त्याने जीडी आर्ट अभ्यासक्रम पुर्ण केला. आता विठ्ठलवाडीजवळ स्टुडिओ सुरू करून मिळेल ती कामे करत असतो. त्याला पु. ल. देशपांडे उद्यानाला लागून असलेले २०० फूट लांबीची व १० फूट उंचीची एक भिंत चित्र काढायला मिळाले. या भिंतीचे त्याने सोने केले आहे. संपुर्ण पुणे दर्शनच त्याने या भिंतीवर चितारले आहे.     रितेश, सचिन, अंबादास हेही असेच परगावाहून पोट भरण्यासाठी म्हणून पुण्यात आलेले. त्यांचे तर चित्रकलेचे पारंपरिक शिक्षणही नाही झालेले, तरीही हातात असलेल्या कलेच्या बळावर ते पुण्यात आले व फिरत होते. त्यांच्याही हातांना आता हे भिंतींवर चित्र काढायचे काम मिळाले आहे. खडकवासला धरण, पर्वती, सारसबाग अशा निरनिराळ्या स्थळांची चित्र ते काढत असतात.  बालभारती संस्थेची संरक्षक भिंत, धायरीतील उड्डाणपूल, अशा अनेक ठिकाणी सध्या ही चित्रकारी सुरू आहे.अ‍ॅपेक्स रंगाने ही चित्र रंगवली जातात. किमान चार ते पाच तास एक चित्र पुर्ण करायला लागतात. अ‍ॅपेक्सचे पावसातही खराब न होणारे रंग ते वापरतात. खडबडीत भिंतींवर चित्र काढायचे एक वेगळेच शास्त्र आहे. ते या कलाकारांनी अनुभवातून आत्मसात केले आहे. त्यामुळेच कागदावर चालतो तसाच ब्रश ते या भिंतींवरही अगदी सहज चालवतात. चित्र काढता येतात याचाच आनंदपैसे मिळतात हा आनंद आहेच, पण काम करायला मिळते हे त्यापेक्षा मोठे आहे. कोणताही चित्रकार पैशांसाठी म्हणून काम करत नाही. आम्हीही करत नाही, मात्र कामच मिळत नाही ही परिस्थिती त्याच्यासाठी फार वाईट असते. पुण्यात आता भिंतींवर का होईना चित्र काढायला मिळते आहे हे फार आनंदाचे आहे. आता तर हे आव्हानात्मक काम करायला जास्त मजा येत आहे.ज्ञानेश्वर उर्फ अवधूत सोमुलवार, चित्रकार

टॅग्स :Puneपुणेpaintingचित्रकलाartकलाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका