सेवानिवृत्तीनंतर ‘चांगभलं चांगभलं’
By Admin | Updated: January 24, 2017 01:17 IST2017-01-24T01:17:32+5:302017-01-24T01:17:32+5:30
सेवानिवृत्तीनंतर एखाद्या व्यक्तीला अगदी दिवस खायला उठतो, तर दुसऱ्याला सवड असून कसलीच आवड नाही, असेही चित्र समाजात

सेवानिवृत्तीनंतर ‘चांगभलं चांगभलं’
जुन्नर : सेवानिवृत्तीनंतर एखाद्या व्यक्तीला अगदी दिवस खायला उठतो, तर दुसऱ्याला सवड असून कसलीच आवड नाही, असेही चित्र समाजात दिसत असते. अशा परिस्थितीत सेवानिवृत्तीनंतरच्या काहीशा कंटाळवण्या जीवनशैलीत मनाला विरंगुळा देण्यासाठी त्यांनी हातात लेखणी घेतली आणि ढंगदार विनोदी ग्रामीण इरसाल भाषाशैलीत छोट्या कथा लिहिण्याचा छंद जोपासला. विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, दिवाळी अंक यात कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि याच सातत्यपूर्ण लिखाणातून ‘चांगभलं चांगभलं’ नावाचे विनोदी कथासंग्रहाचे पुस्तक प्रकाशित करता आले. आयुष्यात विरंगुळा शोधणाऱ्या सेवानिवृत्तांना ही गोष्ट प्रेरणादायी आहेच तर लिहिते व्हा, हा संदेश देणारी आहे. जुन्नर येथील महाराष्ट्र राज्य वीज मडंळाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामभाऊ लोखंडे यांच्या चांगभलं या विनोदी कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. याप्रसंगी भास्कर लगड, पांडुरंग मोढवे, अॅड. राजेंद्र बुट्टे, सु. ल. खुटवड, वीज कंपनीचे कर्मचारीवृंद उपस्थित होते. (वार्ताहर)