... उलगडला चित्रपटांचा सोनेरी काळ

By Admin | Updated: February 13, 2017 02:17 IST2017-02-13T02:17:22+5:302017-02-13T02:17:22+5:30

तुडुंब भरलेले सभागृह... कृष्णधवल चित्रपटांमधील सोनेरी काळ आणि आपल्या मोहक हास्याने घायाळ करणारी मधुबाला आणि अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी

... the golden period of the films unfolded | ... उलगडला चित्रपटांचा सोनेरी काळ

... उलगडला चित्रपटांचा सोनेरी काळ

पुणे : तुडुंब भरलेले सभागृह... कृष्णधवल चित्रपटांमधील सोनेरी काळ आणि आपल्या मोहक हास्याने घायाळ करणारी मधुबाला आणि अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी या दोघींचा चित्रपट कालखंड रसिकांसमोर उलगडत गेला. ‘स्वरसाज’तर्फे या मैफलीत दिल एक मंदिर है, आयेगा आनेवाला, इन्ही लोगोंने, साज दिल छेड दे, रुक जा रात ठहर जा रे, चंदा वो चांद जहाँ वो जाये, मोहे पनघटपें नंदलाल या गीतांचा सिलसिला ‘आखोंमें तुम दिलमें तुम हो’, ‘पांच रुपया बारा आना’ या गीतांमुळे उत्तरोत्तर रंगत गेला.
रसिकांच्या नृत्याच्या साथीने व घनश्याम आगरवाल यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंग भरले. स्वाती शहा, अर्चना पंतसचिव, अनुजा पंडित, अभिजित भिडे, पराग वडगावकर, करिश्मा वाटवे यांनी गीते सादर केली. या कार्यक्रमास संगीतकार सचिन इंगळे, पपीशकुमार ललगुणकर, रामदास गायकवाड, संगीतकार हर्षित अभिजात आदी मान्यवर व रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: ... the golden period of the films unfolded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.