शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट रसिकांसाठी सुवर्णसंधी ; पुण्यात 'ऑनलाइन चित्रपट रसास्वाद' शिबिराचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 15:16 IST

साहित्य आणि चित्रपट, चित्रपटाचे जतन, प्रेक्षक चळवळीची आवश्यकता, चित्रपटाचे प्रकार अशा अनेक विषयांभोवती चर्चा व मार्गदर्शन..

ठळक मुद्देचित्रपट माध्यमाचे व्यामिश्र स्वरूप व त्याच्या शक्‍यता, चित्रपट भाषेची उकल यावरील व्याख्यानांचा समावेश

पुणे : चित्रपट पाहण्याचे एक कौशल्य असते. त्या चित्रपटाची रचना, त्या चित्रपटाचे आस्थाविषय समजून घेऊन ते शोधायला लागतात. एखादा विषय दीर्घकाळ स्मरणात का राहतो ? हे पटकन सांगता येत नाही. त्यासाठी तो चित्रपट त्याचे तंत्र, रचना, कलात्मकता समजून घ्यावी लागते. यातून चित्रपट रसास्वादाचे महत्व अधोरेखित होते.याच जाणिवेतूनच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय” व “फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया” यांनी सुजाण चित्ररसिक होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन “रसास्वाद सिनेमाचा हे ऑनलाईन शिबिर १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या दरम्यान आयोजित केले आहे.    मराठी भाषेतून चालणारा हा एकमेव उपक्रम आहे.  यंदा 'कोविड १९ कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या प्राप्त परिस्थितीत हे शिबिर ऑनलाईन आयोजित करण्यात येणार आहे. सत्यजीत राय यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे पं रावे शिबिर आयोजित केले जात आहे.     चित्रपट माध्यमाचे व्यामिश्र स्वरूप व त्याच्या शक्‍यता, चित्रपट भाषेची उकल यावरील व्याख्यानांचा या शिबिरात समावेश आहे. याशिवाय चित्रपटाचा इतिहास व जागतिक सिनेमातील नव्या वाटा याबद्दलचे व्याख्यानही या शिबिरात होणार आहे. भारतीय सिनेमाला आकार देणाऱ्या “नवसिनेमाची” वाटचाल तसेच “मराठी सिनेमाचा” इतिहास दृश्यफितीद्वारे दाखविला जाणार असून, लोकप्रिय' सिनेमाची या शिबिरात चर्चा केली जाणार आहे. चित्रपटातील दृश्यात्मकता, चित्रपटातील संगीताची परिणामकारकता विशद करणारी व्याख्याने, चित्रपट माध्यमाचे स्वरूप, त्याची रचना याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. याशिवाय साहित्य आणि चित्रपट, चित्रपटाचे जतन, प्रेक्षक चळवळीची आवश्यकता, चित्रपटाचे प्रकार अशा अनेक विषयांभोवती चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरात डॉ. मोहन आगाशे, समर नखाते, दीपक देवधर, सुहास किर्लोस्कर, अभिजीत देशपांडे, अनुपम बर्वे, उमेश कुलकर्णी, श्यामला वनारसे, सुषमा दातार, गणेश मतकरी, उज्वल निरगुडकर, अभिजीत रणदिवे, राहुल रानडे, सुधीर नांदगावकर व प्रकाश मगदूम असे अनेक तज्ज्ञ विश्लेषक व्याख्यान देणार आहेत. शिबिराचे समन्वयक सतीश जकातदार आहेत. तसेच तांत्रिक समन्वयक सुहास किर्लोस्कर आहेत.या शिबिरात शिबिरार्थींना ७ ते ८ चित्रपट व काही लघु चित्रपट शेयर ड्राइव्हवर उपलब्ध करून दिले जातील. शेयर ड्राइव्हवरून चित्रपट डाउनलोड करण्यासाठी आवश्यक असणारी डिस्क स्पेस (किमान २ जीबी) आपल्या डेस्कटॉप/ लॅपटॉपवर असणे गरजेचे आहे. या शिबिरासाठी १८ वर्षांवरील इच्छुकांनी नोंदणी करणे आवश्यक असून प्रवेश अर्ज पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. Www.nfai.gov.in या संकेतस्थळावरील नमुना प्रवेश अर्ज डाऊनलोड करुन भरावा. 

टॅग्स :Puneपुणेcinemaसिनेमाartकला