माळशिरसच्या उपसरपंचपदी गोकुळ यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:09+5:302021-07-14T04:14:09+5:30
माळशिरसचे उपसरपंच नंदा गायकवाड यांचा एक वर्षाचा काळ पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणुक घेण्यात आली. सकाळी ...

माळशिरसच्या उपसरपंचपदी गोकुळ यादव
माळशिरसचे उपसरपंच नंदा गायकवाड यांचा एक वर्षाचा काळ पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणुक घेण्यात आली. सकाळी गोकुळ यादव यांनी आपला उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. बारा वाजेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी उपसरपंच पदासाठी गोकुळ यादव यांची बिनविरोध निवड केली. सचिव म्हणुन माळशिरसचे ग्रामसेवक सोनाली पवार यांनी काम पाहीले.
यावेळी सरपंच महादेव भालचंद्र बोरावके,उपसरपंच गोकुळ यादव, माजी उपसरपंच नंदा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य मोहन यादव,माऊली यादव ,राजेंद्र गद्रे,दत्तात्रय डोंबाळे ,अनिसा शेख ,राणी यादव, ,सारिका यादव,पुष्पा ताम्हाणे,रुपाली गुरव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंचपदी गोकुळ यादव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सन्मान करताना सरपंच महादेव बोरावके