शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रांतीचा आनंद गोड, पुणे पोलिसांनी परत केला १ कोटी रुपयांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:22 IST

चोरट्यांनी लुटून नेलेला महिलांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान दागिना असलेले सौभाग्याचे लेणं आता परत मिळाल्याची आशा वाटत नसतानाच पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला गेला आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला.

पुणे : चोरट्यांनी लुटून नेलेला महिलांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान दागिना असलेले सौभाग्याचे लेणं आता परत मिळाल्याची आशा वाटत नसतानाच पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला गेला आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रांतीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली़ पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेले हिरे, सोने, चांदीचे दागिने पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले असून ते ७३ फिर्यादींना पुन्हा प्रदान करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजिण्यात आला होता़ या वेळी आपले चोरीला गेलेले दागिने परत मिळत असल्याचे पाहून अनेक महिलांना आपले अश्रू आवरणे शक्य झाले नाही़ काहींनी पोलिसांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला़शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ७३ गुन्ह्यांतील ३ किलो ५६२़६६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७२६ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ कोटी १ लाख ८ हजार ३०३ रुपयांचा ऐवज परत करण्यात आला़ यापूर्वीही गेल्यावर्षी २०१७ मध्ये ४ कार्यक्रमांतून २ कोटी ३ लाख रुपयांचा ऐवज फिर्यादींना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते परत करण्यात आला होता़ या वेळी सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर, प्रदीप देशपांडे उपस्थित होते़या कार्यक्रमात ४२ लाख रुपयांचा ऐवज गौरव चोरडियांना परत मिळाला़ गौरव चोरडिया (मार्केट यार्ड) म्हणाले, की गेल्या वर्षी दसºयादिवशी आमच्या घरात घरफोडी झाली होती़ हे समजल्यानंतर १० मिनिटांत पोलीस आले़ या दागिन्यांमध्ये आपल्या आईच्या, आजीच्या आठवणी दडलेल्या होत्या़ तेच दागिने चोरीला गेल्याने त्यांना सर्वस्व गेल्याचे दु:ख होत होते़ पुढच्या दोनच दिवसांत पोलिसांनी चोरट्यांना पकडले़ त्यांच्याकडून सर्वच्या सर्व दागिने हस्तगत केले़ ते जसेच्या तसे परत मिळत असल्याचे पाहून खूप आनंद झाला़पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, की चोरीला गेलेला ऐवज त्यांना परत मिळावा, असा आमचा प्रयत्न असतो़ आज येथे पोलिसांचे कौतुक होत आहे़ ही सर्व पोलिसांची कामगिरी आहे़ पोलिसांवर विश्वास ठेवा़ वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा़ आपल्याजवळ चौकात, उन्हातान्हात पोलीस उभा असले तर त्यांची विचारपूस करा़ पुणेकरांचे सहकार्य मिळाले, तर देशात पुणे पोलीस एक नंबरवर येणार आहे़अतिरिक्त पोलीस आयुक्तप्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले़ विवेक देव यांनी सूत्रसंचालन केले़ पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आभार मानले़नमिता गायकवाड (सनसिटी, सिंहगड रोड) : पायी जात असताना चोरट्यांनी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते़ ते परत मिळण्याची आशा सोडून दिली होती़ पण सोन्यासारखे काम करणारी माणसं असल्याने आज आम्हाला हे सोने परत मिळाले आहे़वर्षा टाकळकर (पिंपरी) : गणेशोत्सवात कॅरीबॅगला कट मारून चोरट्याने दागिने चोरून नेले होते़ तेपरत मिळतील, अशी अपेक्षा नव्हती़पण, पोलीस विश्वास देत होते आणि तो खराही ठरला आहे़

टॅग्स :Puneपुणे