देवा गणराया, राज्यात आनंदाची लाट येऊदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST2021-09-11T04:13:43+5:302021-09-11T04:13:43+5:30
इंदापूर : राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाची लाट आहे. यामध्ये अनेकांच्या घरातील अनेक सदस्यांनी जागाच निरोप घेतला. त्यामुळे अनेक ...

देवा गणराया, राज्यात आनंदाची लाट येऊदे
इंदापूर : राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाची लाट आहे. यामध्ये अनेकांच्या घरातील अनेक सदस्यांनी जागाच निरोप घेतला. त्यामुळे अनेक लोकांच्या कुटुंबाचा आधार हरपल्याने मन खचले. मात्र सध्या गणरायाच्या रूपाने जगावर कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, तर कोरोना महामारी समूळ नष्ट होऊन जगावर आनंदाची लाट यावी, असे गणरायाचरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी साकडे घातले.
इंदापूर शहरातील ऐतिहासिक अशा नवजवान मित्रमंडळ (शास्त्री चौक) येथील श्री गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी सायंकाळी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशभक्त व मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदीप गारटकर यांनी वरील साकडे घातले.
इंदापूर येथे नवजवान मित्रमंडळाच्या गणपतीची आरती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर.