पिंपळगाव खडकी येथील साखरेमळा वस्तीवरील बाळकृष्ण सदाशिव पोखरकर यांच्या शेतात वास्तव्याला असलेल्या सुखदेव लक्ष्मण टकले या मेंढपाळाच्या वाड्यावर काल रात्री ११ च्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एका शेळीला ठार केले. बिबट्याचा हल्ला झाल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी आरडा-ओरडा केल्यावर बिबट्या शेळीला टाकून ऊस पिकात पसार झाला. मृत शेळीचा पंचनामा वनरक्षक आर.आर. मोमीन आणि वनपाल भोसले यांनी केला.
बिबट्याच्या हल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:20 IST