राजुरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By Admin | Updated: January 25, 2017 01:22 IST2017-01-25T01:22:38+5:302017-01-25T01:22:38+5:30
येथील लळईमळयातील एका शेतक-यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

राजुरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
राजुरी : येथील लळईमळयातील एका शेतक-यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
राजुरी (ता.जुन्नर) येथील लळईमळयातील प्रभाकर गहणाजी औटी यांचा शेळीपालणाचा व्यवसाय आहे. सोमवारी त्यांनी आपल्या सर्व शेळया घराजवळच असलेल्या शेड मध्ये सर्व बांधल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्यांना शेळयांचा मोठामोठाने ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते आपल्या घराबाहेर शेळयांपाशी आल्यानंतर त्यांणा असे दिसुन आले की बिबट्याने एका गाभण शेळीला बाजुच्या शेतात फरफटत नेऊन ठार केले होते. दरम्यान सध्या राजुरी परीसरात ऊसाची तोडणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा नसल्याने हे बिबटे मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. तसेच या बिबटयांणा खाद्य मिळत नसल्याने हे बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. राजुरी परीसरात गेल्या दिड महीण्यात जवळपास पाच ते सात पाळीव प्राण्यांवर हल्ले करू पठार मारलेले आहे. या परीसरात पिंजरा लावावे अशी मागणी बाळासाहेब हाडवळे यांनी केली आहे.
(वार्ताहर)