बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By Admin | Updated: January 9, 2017 02:24 IST2017-01-09T02:24:24+5:302017-01-09T02:24:24+5:30

पारगाव (ता. जुन्नर) येथील तांबेथळमळा शिवारातील पांडुरंग कृष्णा डुकरे यांची एक २ वर्षे वयाची शेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाली.

The goat killed in a leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

बेल्हा : पारगाव (ता. जुन्नर) येथील तांबेथळमळा शिवारातील पांडुरंग कृष्णा डुकरे यांची एक २ वर्षे वयाची शेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाली. दरम्यान ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की पारगाव येथील तांबेथळमळा शिवारातील पांडुरंग डुकरे यांच्या घराशेजारील गोठ्यात त्यांचा जनावरांचा गोठा आहे. त्या गोठ्यात शेळी व इतर जनावरे बांधली होती. आज पहाटेच्या वेळी बिबट्याने भिंतीला भगदाड पाडून आत घुसून शेळीवर हल्ला केला. शेळी जोरजोरात ओरडल्यावर ते जागे झाले असता त्यांना बिबट्याने शेळी जागेवरच ठार केलेली दिसून आली. बिबट्याने ताबडतोब धूम ठोकली. या परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केले असून बिबट्याची दहशतही या भागात होती. बिबट्या अनेक लोकांना दिसला होता. पिंजरा लावण्याची मागणी सचिन डुकरे यांनी केली आहे. वनरक्षक बजरंग केंद्रे व वनकर्मचारी आनंदा गुंजाळ यांनी जाऊन पंचनामा केला आहे. (वार्ताहर)

Web Title: The goat killed in a leopard attack