शेळी, बोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:52+5:302021-06-27T04:07:52+5:30
बारामती :वाढत्या बेकारीमुळे आता रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच चक्क शेळी आणि बोकडाची देखील चोरी होण्यास सुरुवात झाली आहे. शहर ...

शेळी, बोकड
बारामती :वाढत्या बेकारीमुळे आता रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच चक्क शेळी आणि बोकडाची देखील चोरी होण्यास सुरुवात झाली आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतून २० जून रोजी पिंपळी लिमटेक येथून फिर्यादीच्या घरासमोरील गोट्यातून एक बोकड व शेळी चोरी केल्याची तक्रार दाखल आहे. त्याअनुशंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात येत होता. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी हे पिंपळी लिमटेक चौकात आले असलेचे समजले.
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्या दोघांनी आपले नाव अक्षय दादा बोरकर, अशोक विश्वास गंगावणे (रा. दोघे विठठलवाडी, गुणवडी, ता. बारामती, जि. पुणे) असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस चौकशी केली असता त्यांनी लिमटेक येथून एक शेळी व बोकड चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके, पोलीस कॉन्स्टेबल अजित राऊत ,तुषार चव्हाण, अकबर शेख, सुहास लाटणे, दशर इंगोले, होमगार्ड संदीप थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.