‘मामाच्या गावाला जाऊया’
By Admin | Updated: November 27, 2014 23:18 IST2014-11-27T23:18:01+5:302014-11-27T23:18:01+5:30
भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पाळणा:या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणो हीकाळाची गरज आहे.

‘मामाच्या गावाला जाऊया’
पुणो : भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पाळणा:या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणो हीकाळाची गरज आहे. हाच धागा पकडून निर्माता पंकज छल्लाणी आणि लेखक दिग्दर्शक समीर हेमंत जोशी यांनी मामाच्या गावाला जाऊ या ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मामाच्या ओढीने निघालेल्या उच्चभ्रु कुटुंबातील तीन निरागस भावंडाच्या साहसी जंगल सफरीचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट पंकज छल्लाणी फिल्मस् या कंपनीचा आणि पंकज छल्लाणी स्वतंत्र निर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे.
पंचवीस दिवस जंगलातील शुटींग, त्यात लहान मुलं..
तिही शहरातील.. एकशे पंचवीस
जणांचा चमु.. शुटींगच्या
सर्व साहित्यासह डोंगरमाथा चढणं आणि जंगलातील पायी प्रवास.. वणवे, उन, वारा, गारा, पाऊस, वन्यजीव, कीटक, पक्षी तसेच वनसंपत्तीला जपत आणि त्यापासून संरक्षण ह्या सर्व गोष्टी पार पाडत आणि जंगलातील ब:यावाईट गोष्ट¨ंचा सामना
करत या चित्रपटाचे शुटींग पार पडले.
या चित्रपटात अभिनेता अभिजीत खाडकेकर, मृण्मयी देशपांडे यांच्यासह बाल कलाकार शुभंकर अत्रे, साहिल माळगे आणि आर्या भरगुडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या सिनेमाचे संगीत आणि पाश्र्वसंगीत प्रशांत पिल्लाई यांनी दिले असून संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या सिनेमासाठी प्रमोशनल साँग तयार केले आहे. गीतकार संदीप खरे, वैभव जोशी आणि अवधूत गुप्ते यांनी गीते लिहिली आहेत.
सिनेमॅटोग्राफर अभिजीत
अब्दे यांचे छायाचित्रण असून नृत्य दिग्दर्शन जावेन सनादी यांचे आहे. श्रीरंग परिपत्यदार हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून सुचित्र
साठे यांनी संकलन आणि
कला दिग्दर्शन संतोष संखद यांचे आहे. तीन अल्पवयीन भावंडाचे भावविश्व उलगडून दाखवणारा हा सिनेमा आहे.
बॉलीवूडप्रमाणो प्रथमच मराठीत सुनंदा काळुसकर आणि समीर दिक्षीत या अनुभवी सिनेकर्मीनी सुपरवायङिांग प्रोडय़ुसरची जबाबदारी सांभाळली आहे. (प्रतिनिधी)