ग्लोबल स्टार फाऊंडेशनचे बक्षीस वितरण
By Admin | Updated: May 9, 2017 04:09 IST2017-05-09T04:09:38+5:302017-05-09T04:09:38+5:30
ग्लोबल स्टार फाऊंडेशनच्या स्पर्धा महोत्सवाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये स्मार्ट

ग्लोबल स्टार फाऊंडेशनचे बक्षीस वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्लोबल स्टार फाऊंडेशनच्या स्पर्धा महोत्सवाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल, संगीतरत्न, नृत्यरत्न आदी स्पर्धांचा समावेश होता. फाऊंडेशनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी नगरसेविका राणी भोसले, नगरसेवक विशाल तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता सुधाकरराव जाधवर, लेखक श्रीकांत चौगुले, आकाशवाणी केंद्राचे संगीत विभागप्रमुख किशोर खडकीकर, भाग्यश्री गोसावी, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या रेणू सिंग, चाटे शिक्षणसमूहाचे फुलचंद चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजश्री दवणी, सुरेश पवार, निखिल निगडे, अभी वाघमारे, विद्या मेढी, सविधा नाईक, विजया जकाते यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. सारिका दीक्षित आणि चैतन्य कुसूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
इंडियन टॅलेंटचे संजय यादव, उपाध्यक्ष अविनाश रसाळ, खजिनदार सपना गांधी, वंदना गीते, विष्णू पिलाणे, तेजस चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शिवराज पवार, संजीव सुतार यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.