एटीएमचा नंबर मिळवून ५० हजारांना फसविले
By Admin | Updated: April 10, 2017 03:10 IST2017-04-10T03:10:27+5:302017-04-10T03:10:27+5:30
एटीएम कार्ड नूतनीकरण करायचे आहे असे सांगून, त्या कार्डवरील नंबर घेऊन पन्नास हजार रुपये

एटीएमचा नंबर मिळवून ५० हजारांना फसविले
जेजुरी : एटीएम कार्ड नूतनीकरण करायचे आहे असे सांगून, त्या कार्डवरील नंबर घेऊन पन्नास हजार रुपये दुसरीकडे ट्रान्सफर करून फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये सायबर गुन्हा दाखल झाला आहे. कृषी व शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांच्या पत्नी शशिकला कोलते यांची या प्रकरणी फसवणूक झाली आहे. त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
दुपारी अचानक तीस हजार रुपये खात्यावरून ट्रान्सफर झाल्याचा एसएमएस आला. त्यानंतर लगेच वीस हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचा फोन आला.
(वार्ताहर)