नाझरेतून दोन दिवसांत पाणी द्या

By Admin | Updated: November 9, 2015 01:41 IST2015-11-09T01:41:08+5:302015-11-09T01:41:08+5:30

नाझरे जलाशयातून लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेचे दोन दिवसांत आवर्तन सोडावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल

Give water in the two days from Nazarene | नाझरेतून दोन दिवसांत पाणी द्या

नाझरेतून दोन दिवसांत पाणी द्या

जेजुरी : नाझरे जलाशयातून लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेचे दोन दिवसांत आवर्तन सोडावे; अन्यथा
आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नाझरे क.प., जवळार्जुन, मावडी क.प., आंबी व मोरगाव येथील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे. या वेळी शेतकरी
प्रचंड आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी रविवारी जलसंपदा विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली.
गेल्या आठवड्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत जलाशयात केवळ ५१० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असल्याने १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडावे. तेही २० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर याच कालावधीत. या निर्णयामुळे लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी यावेळी वरील मागणी केली.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पुरंदर उपसा योजनेचे कार्यकारी अभियंता मारुती नणवरे, पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे के.एस.पाटील, शाखाधिकारी शहाजी सस्ते, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक महेश राणे, माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे, मोरगावचे सरपंच दत्ता ढोले, जवळार्जुनचे माजी सरपंच माऊली राणे, सोमनाथ टेकवडे, नागेश टेकवडे, रामभाऊ राणे, मावडी क.प. चे सरपंच चंद्रकांत भामे, माजी सरपंच हनुमंत चाचर, अमोल चाचर, दत्ता भामे, यशवंत देशमुख, बाळसाहेब देशमुख, नाझरे क.प.चे सरपंच नानासाहेब नाझिरकर, माजी सरपंच संतोष नाझिरकर, आंबीचे वसंत तावरे, नारायण तावरे आदी दोनशे शेतकरी उपस्थित होते. त्यांनी तीव्र भघवना व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांंच्या भावना आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय करू, असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता ननवरे यांनी शेतकऱ्यांना दिले.
औद्योगिक क्षेत्रासाठी वीर जलाशयावरून पाणीपुरवठा करणे शक्य आहे. योजना त्वरित कार्यान्वित करून त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवता येईल.
- अशोक टेकवडे,
माजी आमदार
१९ नोव्हेंबरनंतर पाणी सोडण्याला काहीच अर्थ राहत नाही. त्या वेळी पिके पाण्याअभावी जळून गेलेली असतील.
- हनुमंत चाचर,
मावडी क. प. चे माजी सरपंच
औद्योगिक वसाहतीसाठी पाणी न देण्याचा निर्णय व तसा ठराव करूनही, लगेच तीन दिवसांत निर्णय जलसंपदा विभागाकडून का बदलण्यात आला.
- सुधाकर टेकवडे,
माजी उपाध्यक्ष, सोमेश्वर
आय.एस.एम.टी कंपनी आणि औद्योगिक वसाहतीचे पाणी आजपासूनच बंद करा.
- संतोष नाझिरकर,
नाझरे क.प.चे माजी सरपंच

Web Title: Give water in the two days from Nazarene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.