छायाचित्रकारांना समाजाने सन्मान द्यावा
By Admin | Updated: September 7, 2014 00:40 IST2014-09-07T00:40:13+5:302014-09-07T00:40:13+5:30
घटकाला विकासात सामवून घ्यावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिका:यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून केली.

छायाचित्रकारांना समाजाने सन्मान द्यावा
पिंपरी : कलेच्या माध्यमातून समाजाची सेवा करणा:या छायाचित्रकार अर्थात फोटोग्राफर्सना समाजाने सन्मान द्यावा, दु: ख आणि आनंदाचे क्षण टिपणा:या कलाकारांच्या कलेची दखल घेतली जावी, त्याच्याकलात्मक गुणांना वाव देण्यासाठी उपक्रम राबविले जावेत, या घटकाला विकासात सामवून घ्यावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिका:यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून केली.
पिंपरी-चिंचवड फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिका:यांनी ‘लोकमत’च्या पिंपरीतील कार्यालयास भेट दिली. गणरायाचे दर्शन घेतले. तसेच लोकमत परिचर्चेत सहभागी होऊन सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शिवा बागुल, उपाध्यक्ष ययाती डफळ, सचिव कमलेश सिनलकर, कार्याध्यक्ष सुरेश जोशी, संघटक अतुल चव्हाण, खजिनदार राम शेळके, सदस्य रामदास शेरखाने, संदीप वेदपाठक, मच्छिंद्र मगर, भूषण शहा आदी उपस्थित होते. यावेळी छायाचित्रकारांनी व्यवसायासमोरील आव्हाने, विकसित झालेले तंत्रज्ञान, छायाचित्रकारांच्या विकासासाठी सुरू असलेले उपक्रमआदींविषयी माहिती देण्यात आली.
अध्यक्ष बागुल म्हणाले, ‘‘चार वर्षापूर्वी भोससी परिसरात संघटनेची स्थापना झाली. या संघटनेत भोसरी, दिघी, चिखली परिसरात साठ सदस्य आहेत. या संघटनेच्या माध्यमातून व्यवसायातील स्पर्धा कमी करण्यात तसेच छायाचित्रकारांच्या गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न केले जातात. तसेच छायाचित्रकारांमध्ये अनेक न्यूनगंड आहेत. ते काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठीही उपक्रम राबविले जात आहेत. प्रदर्शन भरविण्याबरोबरच प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली जातात.’’
मच्छिंद्र मगर म्हणाले, ‘‘कलावंतांचे एकत्रीकरण करून त्यांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न होत आहेत.’’
कमलेश सिन्नलकर म्हणाले, ‘‘पूर्वी निगेटीव्ह रोलवर फोटो काढले जायचे. आता कॅमे:यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्याने निगेटीव्ह एक्सपोजिंग होत नाही. कार्यक्रमानंतर ग्राहकांना निगेटीव्ह दिली जायची. आता सॉफ्ट कॉपीची मागणी होते. याविषयीही छायाचित्रकारांमध्ये सूसूत्रता आणायला हवी. या कलेच्या तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल झाला आहे. एच डी कॅमे:यांच्यामाध्यमातून छायाचित्रे काढली जावीत अशी मागणी ग्राहकांकडून होत
आहे. त्यामुळे तंत्रज्ञनाविषयी जागरूकता आली आहे. लगAांच्या सीडीसाठी प्री वेडींग साँग, कॅन्डल फोटोग्राफीलाही मागणी होत आहे. एलसीडी वॉलवरील प्रोजेक्शन जाऊन एलईडी वॉल प्रोजेक्शन, तसेच करीज्मा अल्बमलाही मागणी वाढली आहे. तंत्रज्ञान वाढले असले
तरी छायाचित्रकार मागासलेलाच आहे.’’
‘‘लगA किंवा कौटुंबिक समारंभाच्या छायाचित्रंसाठी नववनीन अल्बमचे प्रकार उपलब्ध होत आहेत. तसेच प्रकाश योजनेचा
वापर करूनही चांगली छायाचित्रे काढण्यावर भर दिला जात आहे. छायाचित्रकांना इफेक्ट
देणारे सॉफ्टवेअर उपलब्ध
आहेत. त्याची माहितीही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण प्रयोगशील कलावंत आहोत, ही जाणीव ठेऊन छायाचित्रकारांनी आपल्यातील कलेचा विकास साधावा, कलागुणांना वाव द्यावा, असेही मत छायाचित्रकारांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)