शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

Pune: मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा आम्ही आलोच बैला सकट; मराठा बांधवांचा इशारा

By श्रीकिशन काळे | Updated: January 24, 2024 12:33 IST

राज्यात ज्यांची सत्ता हाय, त्यांची केंद्रात पण हाय, मग आरक्षण द्यायला काहीच अडथळा नाय

पुणे: कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाय, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत मराठ्यांचा मोर्चा बंडगार्डन मार्गे पुण्यात दाखल झाला.  नगर रोडवर सर्वत्र भगवं वादळ पहायला मिळाले. प्रत्येकाला मुंबईची ओढ लागली होती आणि त्याला जरांगे पाटील यांची जोड होती. बीड जिल्ह्यातील काही बांधवांनी तर बैलगाडीसह मुबईकडे कुच केली आहे. आरक्षण द्या अन्यथा आम्ही आलो बैलगाडी सकट, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मराठा आरक्षणासाठी बुधवारी जरांगे पाटील यांचा ताफा पुण्यात दाखल झाला. यावेळी हजारो, लाखो मराठे त्यांच्या सोबत चालत होते. कोणी गाडीवर, कोणी दुचाकीवर तर कोणी पायी चालत निघाले होते. पंढरीची वारी जशी निघते अगदी तशीच ही आरक्षणाची वारी मुंबईकडे निघाली आहे. बंडगार्डन रोडवर जागोजागी मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. डोईवर भगवी टोपी आणि मुखी एक मराठा लाख मराठाचा नारा दिला जात आहे. मराठवाड्यातील सोनपेठ येथून आलेले सुरेश खडके, संजय शिंदे, रमेश पाटील म्हणाले, आमच्या कित्येक पिढ्या आरक्षण नसल्यामुळे मागे राहिल्या आहेत. आरक्षण हा आमचा हक्क आहे. त्यासाठी जरांगे पाटील हा माणूस लढतोय. त्याला साथ देण्यासाठी आम्ही सहभागी झालो आहोत. आमच्या खायची प्यायची सोय आम्ही केली आहे. पण ठिकठिकाणी अनेक मराठा बांधव आमच्या जेवणाची सोय करत आहेत. त्यामुळे आम्हाला आता कसलीही फिकिर नाय. आता ही लढाई जिंकल्याशिवाय मागे हटायचे नाय. सर्व समाज आता एक झालाय. राजकीय नेत्यांनाही लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागणार. राज्यात ज्यांची सत्ता हाय, त्यांची केंद्रात पण हाय. मग आरक्षण द्यायला काहीच अडथळा नाय. जर आरक्षणा दिले नाही तर मग सर्व मराठा समाज मतदानाची ताकद दाखवून देईल. मग बसावं लागेल बोंबलत सर्वांना.'' बीड जिल्ह्यातील बैलगाडी घेऊन आलेल्या बांधवांनी चारादेखील सोबत ठेवला आहे. जेणेकरून बैलांनाही कुठेही खाता येईल. स्वतः सोबत बैलाची शिदोरी घेऊन हे बांधव मुंबईकडू निघाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस