पुणे : लॉकडाऊननंतर तब्बल ६०दिवस कोरोनाला दूर ठेवणाऱ्या जनता वसाहतीमध्ये रुग्ण आढळून आल्यानंतर वस्तीमध्ये कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कामासाठी बाहेर पडता येत नाहीये. हातावरील पोट असलेले नागरिक त्यामुळे हवालदिल झाले असून रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांचे रोजगार बंद आहेत. अनेकांना पगार मिळालेले नाहीत. मोलमजुरी करणाऱ्यांच्या जगण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून घरी बसून असलेल्या असंघटित कामगारांना आता रोजगाराचे वेध लागले आहेत.एकीकडे लॉकडाऊन शिथील होत असताना झोपडपट्ट्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे या वस्त्या कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या; जनता वसाहतीमधील नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:09 IST
एकीकडे लॉकडाऊन शिथील होत असताना झोपडपट्ट्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे या वस्त्या कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत...
रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या; जनता वसाहतीमधील नागरिकांची मागणी
ठळक मुद्देरुग्ण आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना