कांद्याला हजाराचा भाव द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू

By Admin | Updated: February 9, 2017 03:13 IST2017-02-09T03:13:27+5:302017-02-09T03:13:27+5:30

नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव घसरले असून शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा व बटाट्याचे भाव गडगडल्याने खर्चही वसूल होत नसून शेतकऱ्यांपुढे फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही

Give the price of the hay to the onion; Otherwise, get on the road | कांद्याला हजाराचा भाव द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू

कांद्याला हजाराचा भाव द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू

चाकण : नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव घसरले असून शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा व बटाट्याचे भाव गडगडल्याने खर्चही वसूल होत नसून शेतकऱ्यांपुढे फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. सरकारने कांद्याला योग्य भाव दिला नाहीतर शेतकरी रस्त्यावर उतरून मोदी सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कांद्याला आज ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आमचे व्यवहार ठप्प झाल्यात. बँकेत पैसे मिळत नाहीत. पैसे काढायला गेल्यावर घ्या पाच हजार, घ्या दोन हजार.., कांदं काढायला बाईला २०० रुपये मजुरी द्यायला लागती, खतं-औषधाचं भाव वाढल्यात. शेतकऱ्यांच्या हातात एक रुपाया बी राहत नाय. माझा दोन एकर कांदा असून सध्याचा भाव पाहून शेती परवडत नाय. कांद्याला कमीत कमी १००० रुपये भाव पाह्यजे, म्हंजी आम्हाला पिशवीमागं शे दोनशे रुपय सुटतील. - शिवराम पुंडे
(शेतकरी, कान्हूर मेसाई, ता. शिरूर )

Web Title: Give the price of the hay to the onion; Otherwise, get on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.