शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पक्षातीलच उमेदवार द्यावा; कॉँग्रेस निष्ठावंतांचे राहुल गांधींना पुन्हा साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:01 IST

पक्ष देईल त्याचे काम करण्याची ग्वाही

पुणे : ज्येष्ठ काँग्रेस निष्ठावंतांनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना एक पत्र पाठवून पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षात किमान काही वर्षे काम केलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र त्याचबरोबर पक्षाचा उमेदवार बाहेरून येण्याबाबत बरीच चर्चा सुरू असल्याने पक्षाची बदनामी होत असून, आमच्या मागणीचा विचार करावा, पण पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्ही काम करू अशी मखलाशीही केली आहे.माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांनी हे पत्र पाठवले आहे. गेले काही दिवस काँग्रेसचा उमेदवार बाहेरून लादला जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्यापैकी काही इच्छुक उमेदवारांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पक्षाच्या अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत. त्यावरून पक्षात बरेच वादंग सुरू आहे.पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा जुना पारंपरिक मतदारसंघ आहे. पक्षासाठी निवडून येण्याची क्षमता हा उमेदवारी देण्यासाठीचा पहिला निकष असतो, मात्र तरीही उमेदवार पक्षातील असावा, त्याने किमान काही वर्षे पक्षात राहून काम केलेले असावे याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे जरा जास्त होत आहे अशी भीती वाटून की काय पण तिघांनीही पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी तयार असल्याचेही नमूद केले आहे. यातील बाळासाहेब शिवरकर यांनी थेट दिल्लीत जाऊन पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, तर उल्हास पवार यांनी ‘पक्षाच्या निष्ठावंतांना टाळले जात आहे, त्यांचा विचार केला जात नाही, पक्षाच्या बाहेर असलेल्यांना संधी का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करणारे व स्वत: उमेदवार म्हणून तयार असल्याचे पत्र थेट राहुल गांधी यांनाच लिहिले होते.उद्या नाव जाहीर होण्याची शक्यताकाँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावरचा पडदा शनिवारी उठण्याची शक्यता आहे. दिल्लीत केंद्रीय निवड मंडळाची बैठक होत असून, त्यासाठी पुण्यातील इच्छुक शुक्रवारी रात्रीच दिल्लीला गेले आहेत. त्यात पक्षातील इच्छुकांबरोबरच पक्षाबाहेरील इच्छुकांचाही समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी