एकदा मनसेला संधी द्या
By Admin | Updated: October 1, 2014 00:30 IST2014-10-01T00:30:18+5:302014-10-01T00:30:18+5:30
कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून दोन आमदारांना संधी देण्यात आली ते राज्यमंत्रीही झाले,

एकदा मनसेला संधी द्या
>पुणो : कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून दोन आमदारांना संधी देण्यात आली ते राज्यमंत्रीही झाले, मात्र, अद्यापही कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या आणि पर्यायाने शहराच्या समस्या तशाच आहेत, त्यामुळे आता मतदारांनी मनसेला संधी देऊन बघा, बदल निश्चित जाणवेल,’ असे मत कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अजय तायडे यांनी आज व्यक्त केले.
तायडे यांनी मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. तसेच ताडीवाला रस्ता झोपडपट्टीतही कार्यकर्ता मेळावा घेतला.
तायडे म्हणाले, ‘या मतदारसंघाने दोन आमदारांना संधी दिली आहे. मात्र, त्यानंतरही घोरपडी उड्डाणपूल, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या समस्या कायम आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघाबरोबरच शहरातील वाहतूक समस्या, शहराची सुरक्षा तसेच इतर प्रश्न विधानसभेत जाऊनही सोडविले जात नाहीत, त्यामुळे आता मतदारांनीच बदल घडवून आणणो आवश्यक बनले असून, त्यासाठी मतदारांनी सर्वाना संधी दिली असून आता मला विकासासाठी संधी द्यावी. गेल्या दोन वर्षात महापालिकेच्या माध्यमातून मंगळवार पेठ परिसरातील झोपडपट्टी परिसराच्या विकासासाठी आपण 18 कोटी रुपयांची विकासकामे महापालिकेच्या माध्यमातून केली आहेत. तसेच यापुढेही आपला अजेंडा केवळ विकासाचाच असणार आहे.
आज दिवसभरात तायडे यांनी कॅम्प परिसरातील चर्चचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाज प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
मनसेचे नगरसेवक बाबू वागसकर, गजेंद्र परदेशी, महेश लाड, रामचंद्र देवर, धनंजय कांबळे, शाम रोंगे, प्रकाश साळवे, वळळापा भिंगारे, प्रमोद वनशिव, नितीन रोकडे, शरद चाबुकस्वार, दीपक ओव्हाळ या वेळी उपस्थित होते.